Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC : कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांसाठी खूशखबर, ‘या’ श्रेणीची भाडेवाढ रद्द

गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटीच्या बसेसच्या एकेरी गट ( एका दिशेचे ) आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 24, 2025 | 04:35 PM
कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांसाठी खूशखबर, 'या' श्रेणीची भाडेवाढ रद्द (फोटो सौजन्य-X)

कोकणात जाणाऱ्या एसटी प्रवाशांसाठी खूशखबर, 'या' श्रेणीची भाडेवाढ रद्द (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गौरी गणपती उत्सवासाठी तुम्ही जर कोकणात जाणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सटीच्या बसेसच्या एकेरी गट ( एका दिशेचे ) आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी – प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

यावेळी प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) गेली ७७ वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देत आले आहे. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला फायदा -तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासा बरोबरच सण, यात्रा ,उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः गणपती उत्सव, आषाढी यात्रा, होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षण साठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात.

पुढील २४ तास कोकणासाठी अत्यंत धोक्याचे; उंचच उंच लाटा अन्…; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

यंदा देखील मुंबई व उपनगरातील चाकरमानी- प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल ५ हजार जादा एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने केली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या अमृतज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात. प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो.

सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो! सबब, तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर ३० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार तसेच मुंबई व उपनगरातील मराठी चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता, यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे.

उत्सव काळात एसटीचे भाडे खाजगी बसेसच्या तुलनेत अत्यल्प

गणपतीउत्सव मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. कोकणी माणसाचे एसटीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. त्यामुळे तोटा सहन करून देखील एसटी गणपती उत्सव, दिवाळी, होळी या सारख्या उत्सव काळात चाकरमान्यांना नेहमीच प्रवासी सेवा देत आली आहे. यापुढेही देत राहील! परंतु, चाकरमानी – प्रवाशांनी देखील एसटीच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा! कारण सध्या उत्सव काळामध्ये खाजगी बसेस भरमसाट भाडेवाढ करतात. त्यांच्या वाढत्या तिकीट दराच्या तुलनेमध्ये एसटीचे तिकीट दर हे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे भविष्यात एसटीने तत्कालीन दरवाढ केल्यास प्रवाशांनी त्याला सहकार्य करावे! असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

मागील वर्षी ११.६८ कोटी रुपये नुकसान

मागील वर्षी एसटी महामंडळाने गणपती उत्सवासाठी जाताना ४३३० बसेस व परतीच्या प्रवासासाठी ११०४ बसेस उपलब्ध करून दिलेल्या होत्या. तथापि , एकेरी गटारक्षणामुळे गणपती उत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांना कोकणात त्यांच्या इच्छित स्थळी पोचवून रिकाम्या बसेस परत आणाव्या लागल्या, तसेच त्यांना परतीच्या प्रवासासाठी देखील बसेस उपलब्ध करून देताना रिकाम्या बसेस राज्याच्या विविध भागातून कोकणात पाठवाव्या लागल्या. त्यामुळे इंधन खर्च, चालक वाहकांचे वेतन, अतिकालीन भत्ता याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा एसटीवर पडला. यातून गणपती उत्सवाच्या काळामध्ये मिळालेल्या उत्पन्नामध्ये तब्बल ११ कोटी ६८ लाख रुपये तोटा महामंडळाला सहन करावा लागला. यंदा ५ हजार बसेस सोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या सर्व बसेस एकेरी गट आरक्षणासाठी आरक्षित झाल्यास हा तोटा १३ ते १६ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

जलजीवन बनतंय कंत्राटदारांसाठी जीवघेणे; सरकारच्या थकबाकीचा आकडा वाचून बसेल धक्का

Web Title: One side group reservation fare hike for msrtc passengers in konkan cancelled st bus reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus

संबंधित बातम्या

एस टी महामंडळात सुवर्ण भरती! प्रशिक्षणासाठी उमेदवारांना करता येणार अर्ज; जाणून घ्या भरती प्रक्रिया
1

एस टी महामंडळात सुवर्ण भरती! प्रशिक्षणासाठी उमेदवारांना करता येणार अर्ज; जाणून घ्या भरती प्रक्रिया

Exclusive : ‘फाटलेली आसनं, तुटलेले पत्रे….! खिळखिळ्या बसप्रमाणेच महामंडळाचीही अवस्था…’, श्रीरंग बरगे यांचा आरोप
2

Exclusive : ‘फाटलेली आसनं, तुटलेले पत्रे….! खिळखिळ्या बसप्रमाणेच महामंडळाचीही अवस्था…’, श्रीरंग बरगे यांचा आरोप

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत
3

ई-वाहनांना मिळतीये टोलमाफी; एसटीला होतोय फायदा, महिन्याला सव्वा कोटींची होणार बचत

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती
4

Pune News: एसटी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्वप्न अखेर पूर्ण; ‘इतक्या’ जणांना मिळाली पदोन्नती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.