Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याला हंगामातील मिळाला सर्वात कमी दर; 800 ते 1500 रुपये प्रति क्विंटल भाव

ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 10, 2025 | 07:57 AM
केंद्र सरकार २४ रुपये दराने कांदा विकणार

केंद्र सरकार २४ रुपये दराने कांदा विकणार

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी जवळपास 2 लाख 55 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख 60 हजार क्विंटलची आवक झाली. शुक्रवारी उन्हाळ कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून ते सर्वसाधारण 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1125 रुपयांचा दर मिळाला. नाशिक बाजारात 800 रुपये, सिन्नर बाजारात 1000 रुपये, पैठण बाजारात 900 रुपये, चांदवड बाजारात 970 रुपये, सटाणा बाजारात 115 रुपये, गंगापूर बाजारात 975 रुपये, उमराणे बाजारात 1100 रुपयांचा दर मिळाला. तसेच सोलापूर बाजारात 21000 क्विंटलची आवक झाली तर सरासरी 750 रुपये दर मिळाला.

धुळे बाजारात या हंगामातील सर्वात कमी असा 240 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर धाराशिव बाजारात 1050 रुपये असा दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची बारा हजार क्विंटलचे आवक होऊन सरासरी 900 रुपये दर मिळाला.

ढोबळी मिरची स्थिर

बाजारात ढोबळी मिरचीची आवक स्थिरावलेली दिसत आहे. तर ढोबळ्या मिरचीला उठावही चांगला आहे. त्यामुळे ढोबळ्या मिरचीचे भाव टिकून आहेत. सध्या ढोबळ्या मिरचीला प्रतिक्विंटल सरासरी 3 हजार ते 4 हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. ढोबळ्या मिरचीची आवक पुढील काळातही कमी राहणार आहे. मे महिन्यानंतर आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तर बाजारातील मागणी कायम राहू शकते. त्यामुळे दरालाही आधार मिळेल, असे व्यापारी सांगत आहेत.

टोमॅटो दर मंदीतच

टोमॅटोचा भाव दबावातच आहे. बाजारातील टोमॅटोची आवक सुरळीत सुरु आहे. आवकेचा दबाव बाजारावर दिसून येत आहे. राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढलेली आहे. तर पुढे टोमॅटोचा उठाव स्थिर आहे. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी 700 ते 1100 रुपयांचा भाव मिळत आहे.

Web Title: Onion gets lowest price of the season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 07:57 AM

Topics:  

  • Indian Inflation
  • Market
  • Onion Market
  • Rates of Vegitables

संबंधित बातम्या

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
1

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.