Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रत्नगिरीत ११ मार्चला ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन

सरकारी यंत्रणांचा वापर करून देशातील विरोधी पक्ष संपविण्याची प्रक्रिया बिनदिक्कत सुरू आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 07, 2024 | 11:01 AM
रत्नगिरीत ११ मार्चला ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशाही विरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत ११ मार्चला निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामाजिक कार्यकर्ते तसेच विचारवंत व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी आणि मानवी हक्क, संविधान विश्लेषक व कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे मानवी हे मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा छत्रपती शिवाजी नगर येथील शासकीय जलतरण तलाव मैदानावर सायंकाळी ४ वाजता होणार आहे. ही सभा ‘आम्ही निर्भय रत्नागिरीकर’च्या वतीने होणार आहे.

बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिलांवरील अन्याय, अल्पसंख्यांक समुदायांच्या अधिकारांचा संकोच, शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या, दलितांवरील अत्याचार, सांविधानिक संस्था व प्रशासकीय यंत्रणा यांवर निर्माण केलेल्या दबाव, डिजिटल माध्यमांवर निर्माण केलेली हुकूमत आदी आजचे कळीचे मुद्दे आहेत. मात्र या मूलभूत प्रश्नांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून मंदिर, मस्जिद मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य जनतेचे लक्ष वळवले जात आहे. संसदेत मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या खासदारांना मोठ्या प्रमाणावर संविधानिक पद्धतीने निलंबित केले जात आहे. सरकारी उद्योगांचे खासगीकरण, कमी पटसंख्येच्या नावाखाली हजारो शाळा बंद करत बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित केले जात आहे. भांडवलदारांच्या हिताचा विचार करून शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरित केल्या जात आहेत. शेतीचे कंपनीकरण करण्याचे धोरण, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी बनविलेले कायदे बदलून भांडवलदारांच्या हिताचे करण्याचे काम सुरू आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य काढून घेतले जात आहे.

सरकारी यंत्रणांचा वापर करून देशातील विरोधी पक्ष संपविण्याची प्रक्रिया बिनदिक्कत सुरू आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे. अशा परिस्थितीत समाजातील बुद्धिजीवी, विचारवंत, समाजिक जाणीव असणारी व्यक्ती, संस्था, संघटना, पक्षांनी शांत न राहता निर्भय होऊन या व्यवस्थेच्या विरोधात संघटितपणे लढा उभारणे गरजेचे आहे. यादृष्टीने प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ‘निर्भय बनो’ हे अभियान महाराष्ट्रभर राबविले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ‘आम्ही निर्भय रत्नागिरीकर तर्फे येथे ही सभा आयोजित केली आहे.

या सभेला रत्नागिरी शहर-तालुका तसेच संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यातून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक अभिजीत हेगशेट्ये, दीपक राऊत, बशीर मुर्तुझा, विलास कोळपे, कुमार शेट्ये यांनी केले आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी विजय जैन, नदीम सोलकर, रफीक बिजापूरी, रघुवीर शेलार, अशोक भाटकर, एस. व्ही. शेलार, रवींद्र कोळवणकर, रामभाऊ गराटे, नीलेश भोसले, काका तोडणकर, ॲड. अश्विनी आगाशे, श्रुती सुर्वे, कल्पना भिसे, वल्लभ वणजू, रहीम दलाल, निस्सार दर्वे, सादीक पावसकर, विजय कुरडकर, दिलावर गोदड, विनोद वायंगणकर, बबन आंबेकर, विकास पेजे, नजीर वाडकर, सईद पावसकर, आप्पा वांदरकर, दीपक सुर्वे, शब्बिऱ भाटकर, रवी घोसाळकर, नौसीन काझी, प्रीतम आयरे, खालील वस्ता हे मेहनत घेत आहेत.

Web Title: Organization of nirbhay bano meeting on 11th march in ratnagiri maharashtra political party maharashtra government ratnagiri news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2024 | 11:01 AM

Topics:  

  • Government of India
  • Maharashtra Government
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!
1

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”;  राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना
3

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना

Jobs In Maharashtra: मोठी बातमी! सहकारी बँकांमध्ये स्थानिकांना ७०% नोकऱ्या देणार; राज्य सरकारची मोठी घोषणा
4

Jobs In Maharashtra: मोठी बातमी! सहकारी बँकांमध्ये स्थानिकांना ७०% नोकऱ्या देणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.