Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत येत्या 20 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यात विद्यार्थ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्व व जलसंवर्धन या विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. या तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांसाठी येत्या मंगळवारी दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी 10 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 16, 2024 | 06:08 PM
‘जल जीवन मिशन’ अंतर्गत येत्या 20 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यात विद्यार्थ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे महत्व व जलसंवर्धन या विषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आले होते. या तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन स्पर्धकांसाठी येत्या मंगळवारी दि.20 फेब्रुवारी 2024 रोजी 10 वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी माहिती दिली.

जिल्ह्यात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत ‘हर घर नल से जल’ देण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर सुरु आहेत. पिण्याचे पाणी , पाणी पुरवठा योजना, योजनेमध्ये लोकसहभाग, पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत झाल्यानंतर योजनेची देखभाल तसेच योजना शाश्वत राहण्यासाठी पाणीपट्टी वसुली व स्रोत बळकटीकरणासाठी जल संवर्धन याचे महत्व विद्यार्थी दशेपासूनच रुजावे व त्यांच्यात पाण्याविषयी जनजागृती व्हावी यासाठी जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर निबंध, चित्रकला, लघुपट स्पर्धा तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या पहिल्या स्पर्धकांमधून जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे.

या जिल्हास्तरीय महाविदयालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन,पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती जल संवर्धन हे विषय आहेत. या वक्तृत्व स्पर्धांसाठी ११ वी ते १२वी हा कनिष्ठ गट व पदवीपर्यंत असे महाविदयालयीन दोन गट होते. सर्व तालुक्यातील या दोन्ही  गटातील प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांमधील स्पर्धकांसाठी जिल्हास्तरावर स्पर्धा होणार आहे.या जिल्हास्तरावरील दोन्ही गटात प्रथम , द्वितीय व तृतीय  क्रमांक पटकावणा-या विद्यार्थ्यांना अनुक्रमे २१ हजार , ११ हजार व ५ हजार पाचशे रूपये अशी रोख बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील तालुकास्तरीय पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांसाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड यांनी केले आहे तसेच तालुकास्तरावर निबंध, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेस विद्यार्थ्यांमधून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Organized district level speech competition on 20th february under jal jeevan mission nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2024 | 06:08 PM

Topics:  

  • Jal Jeevan Mission

संबंधित बातम्या

जलजीवन बनतंय कंत्राटदारांसाठी जीवघेणे; सरकारच्या थकबाकीचा आकडा वाचून बसेल धक्का
1

जलजीवन बनतंय कंत्राटदारांसाठी जीवघेणे; सरकारच्या थकबाकीचा आकडा वाचून बसेल धक्का

सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावर आव्हाडांचे टीकास्त्र
2

सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणावर आव्हाडांचे टीकास्त्र

Harshal Patil suicide : जलजीवनाने घेतला ‘जीव’! सरकारने पैसे न दिल्याने कंत्राटदार तरुणाने केली आत्महत्या
3

Harshal Patil suicide : जलजीवनाने घेतला ‘जीव’! सरकारने पैसे न दिल्याने कंत्राटदार तरुणाने केली आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.