श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे व कुकडी एज्युकेशन सोसायटी पिंपळगाव पिसाचे संस्थापक स्व. कुंडलिकराव रामराव जगताप यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त सावित्रीबाई कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव पिसा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक ०८ ते १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
या हरिनाम सप्ताहात ह. भ. प. सोनाली कर्पे, ह.भ.प. चंद्रकांत खळेकर, ह.भ.प. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर, ह.भ. प. बाळकृष्ण महाराज गिरगावकर, ह.भ.प. अक्रुर महाराज साखरे, ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे हरी किर्तन होणार आहेत. तसेच काल्याचे किर्तन भागवताचार्य ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांचे होणार आहे.
[read_also content=”एसटी बसमधून २४ लाखांची रोकड लुटली; यवत हद्दीतील घटना https://www.navarashtra.com/maharashtra/24-lakh-cash-looted-from-st-bus-incidents-in-yawat-territory-nrdm-333811.html”]
दरम्यान परिसरातील सर्व भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी उपस्थित राहवे, असे आवाहन कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा मध्य. सहकारी बॅंकेचे संचालक, मा. आ. राहुल जगताप व कर्मयोगी कुंडलिक रामराव जगताप, कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती राहुल जगताप पाटील यांनी केले आहे.