Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC: वादग्रस्त विकास आराखड्यावर ४० हजारांवर हरकती; नगरसेवकांच्या चर्चेविना आराखडा मंजुरीकडे?

सध्या शहरात सुमारे ७०% सांडपाणी प्रक्रिया न होता थेट नद्यांमध्ये सोडले जाते. पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रोज लाखो लिटर अप्रामाणिकरित्या सांडपाणी मिसळते

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2025 | 01:30 AM
Pimpri News : एकदाही कर न भरलेले शहरात तब्बल 34 हजार 22 मालमत्ताधारक; महापालिका 'अ‍ॅक्शन मोड'वर

Pimpri News : एकदाही कर न भरलेले शहरात तब्बल 34 हजार 22 मालमत्ताधारक; महापालिका 'अ‍ॅक्शन मोड'वर

Follow Us
Close
Follow Us:
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरासाठी १४ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या सर्वंकष विकास आराखड्यावर (डीपी) अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ४० हजारांहून अधिक हरकती, सूचना आणि आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या हरकतींवरून नागरिकांचा डीपीवरील तीव्र विरोध स्पष्ट झाला असून, “हा वादग्रस्त डीपी रद्दच करावा,” अशी भूमिका आता शहरवासीयांनी घेतली आहे.
शुक्रवारपर्यंत (१२ जुलै) ३७,५०० हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या होत्या. शनिवारी व रविवारी सुट्टीमुळे त्या स्वीकारण्यात आल्या नाहीत. सोमवार (दि.१४) रोजी हरकती सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नागरिक मोठ्या संख्येने प्रतिक्रिया देत असून एकूण आकडा ४० हजारांचा टप्पा पार करू शकतो, अशी शक्यता आहे. या सर्व गोंधळामुळे डीपी तयार करणारे मनपा नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची नुकतीच राज्य सरकारने बदली करण्यात आली.
सामान्यांचे घर आरक्षित, बिल्डरांचे प्लॉट मोकळे?
या आराखड्यात सामान्य नागरिकांच्या घरांवर विविध आरक्षणे टाकली गेली, तर दुसरीकडे अनेक बिल्डरांच्या हिताचे भूखंड मात्र मुक्त ठेवण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे शहरभर संतप्त भावना पसरल्या असून ठिकठिकाणी आंदोलने झाली आहेत. या विरोधाची दखल घेत शहरातील पाचपैकी तीन आमदारांनी हा मुद्दा विधीमंडळात मांडला. परिणामी, सरकारने चुकीची आरक्षणे रद्द करण्याचे आश्वासन द्यावे लागले.
चुकीचे आरक्षण आणि नदी पूररेषेतील बदल
आराखड्यात अनेक वादग्रस्त बाबी समोर आल्या आहेत. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पूररेषांमध्ये बदल करत महापालिकेच्या पूररेषा व पाटबंधारे विभागाच्या पूररेषा वेगळ्या ठरवल्या गेल्या आहेत. तसेच काही टेकड्यांना थेट निवासी झोनमध्ये दाखवून बिल्डरधार्जिणी नियोजन केल्याचे आरोप आहेत. मोशीसारख्या भागात तर तीर्थक्षेत्र आळंदीच्या जवळच कत्तलखान्यासाठी आरक्षण टाकण्यात आले होते. स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे महापालिकेला ते आरक्षण मागे घ्यावे लागले.

Pimpri News: हिंजवडीत अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू; आठ जणांविरोधात गुन्हे दाखल

आराखडा जाहीर करताना नगरसेवकांचा सहभागच नाही
नवीन विकास आराखडा प्रशासकीय राजवटीच्या शेवटच्या टप्प्यात, कोणत्याही लोकप्रतिनिधींच्या चर्चेशिवाय जाहीर करण्यात आला. येत्या काही महिन्यांत महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा वेळी नवे सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नगरसेवकांच्या सविस्तर चर्चेनंतरच आराखडा जाहीर व्हायला हवा होता, असे मत अनेकांनी मांडले आहे. प्रशासकीय घाईत आराखडा जाहीर केल्यामुळे यात विशिष्ट हितसंबंध जपले गेले असल्याचा संशय नागरिकांमध्ये बळावला आहे.
जनतेच्या रेट्याचा विजय, पण अजून अंतिम निर्णय नाही
सरकारने चुकीच्या आरक्षणांची दखल घेत काही आश्वासने जरी दिली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची वाट नागरिक पाहत आहेत. शहरावर परिणाम करणाऱ्या या महत्त्वाच्या आराखड्यावर सरकार काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुविधांशिवाय वाढ कशी?
आज शहरात मूलभूत सुविधा म्हणजे स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, पाणीपुरवठा या अनेक क्षेत्रांत भरपूर त्रुटी आहेत. एफएसआय वाढवल्यास लोकसंख्या अधिक प्रमाणात वाढेल, त्याच प्रमाणात कचरा, सांडपाणी आणि जलवायू तणाव वाढणार. मात्र, त्यासाठीची यंत्रणा तयार नसताना वाढीव एफएसआयला परवानगी देणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते.
सध्या शहरात सुमारे ७०% सांडपाणी प्रक्रिया न होता थेट नद्यांमध्ये सोडले जाते. पवना आणि इंद्रायणी या नद्यांमध्ये रोज लाखो लिटर अप्रामाणिकरित्या सांडपाणी मिसळते. अशा स्थितीत नवीन विकास प्रकल्पांना परवानगी देणे म्हणजे आधीच संकटात असलेल्या नद्यांना आणखी दूषित करणे होय.
‘आधी पायाभूत सुविधा, मग विकास’ अशी मागणी
शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) सक्षमपणे सुरू करावेत, जलशुद्धीकरण, कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियोजन आणि हिरवळ संवर्धन या सर्व बाबी आधी सक्षम कराव्यात. त्यानंतरच एफएसआय वाढवण्याचा विचार करावा, अशी स्थानिकांची ठाम भूमिका आहे.
नदीकाठी वृक्षतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास
शहर विकास आराखड्यात पवना नदीकाठच्या हरित पट्ट्यातील झाडांची तोड, प्राणी-पक्ष्यांच्या अधिवासाची नासधूस व त्याठिकाणी ‘जॉगिंग ट्रॅक’ सारख्या कृत्रिम सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे. हे निसर्गाच्या समतोलाला धक्का देणारे असून, एका व्यक्तीमागे किमान आठ झाडं असावीत असा पर्यावरणीय नियम असताना, सध्याचीच झाडं तोडली जात आहेत, यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
शहर विकास आराखड्यात फेरबदल करताना, वाढीव एफएसआयचा विचार करत असताना आधी पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाचे संतुलन राखणे गरजेचे आहे. अन्यथा शहर अनियोजित आणि अस्वस्थ बनण्याचा धोका आहे.
– प्राजक्ता महाजन, नागरिक.

Web Title: Over 40000 objections raised against pimpri chinchwad controversial development plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 01:30 AM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri

संबंधित बातम्या

Pimpari- Chinchwad : जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला अन्…; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
1

Pimpari- Chinchwad : जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला अन्…; पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

PCMC News: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस; पवना-मुळशीमधून विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2

PCMC News: धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस; पवना-मुळशीमधून विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पोलीस आयुक्त थेट उतरले रस्त्यावर; हिंजवडी वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करत दिल्या सूचना
3

पोलीस आयुक्त थेट उतरले रस्त्यावर; हिंजवडी वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी करत दिल्या सूचना

Pimpri News : एकदाही कर न भरलेले शहरात तब्बल 34 हजार 22 मालमत्ताधारक; महापालिकेकडून आता केली जाणार ‘ही’ कारवाई
4

Pimpri News : एकदाही कर न भरलेले शहरात तब्बल 34 हजार 22 मालमत्ताधारक; महापालिकेकडून आता केली जाणार ‘ही’ कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.