Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ता मिळताच दादागिरी! भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर काही तासांतच एका महिला उपायुक्तांना धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 10, 2026 | 11:25 AM
सत्ता मिळताच दादागिरी! भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

सत्ता मिळताच दादागिरी! भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • सत्ता मिळताच दादागिरी!
  • भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
  • नेमकं काय घडलं?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर काही तासांतच एका महिला उपायुक्तांना धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नियम व अटी माझ्या सांगण्यानुसार बदला, अन्यथा तुम्हाला बघून घेईन, अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप भाजप शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

शुक्रवारी महापालिकेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. ८४ नगरसेवकांसह भाजपने सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्ता स्थापन केली. मात्र, सत्तास्थापनेनंतर लगेचच पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप समोर आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चिमट्याने…; चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून बेदम मारहाण

तक्रारीनुसार, महापालिकेच्या एका विभागातील कंत्राट भाजप शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्या ‘सन राईज फाऊंडेशन’ संस्थेला मिळावे, यासाठी त्यांनी महिला उपायुक्तांच्या दालनात जाऊन नियम व अटी बदलण्याची मागणी केली. संबंधित उपायुक्तांनी कंत्राट प्रक्रियेची माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, हजारे यांनी त्यांचे म्हणणे न ऐकता मोठ्या आवाजात शिवीगाळ करत धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार कर्मचाऱ्यांसमोर घडल्याने कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे मानसिक धक्का बसल्याने संबंधित महिला उपायुक्तांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपकडून या प्रकरणात काय भूमिका घेतली जाते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

“माहिती घेत आहे. दोन्ही बाजू जाणून घ्याव्या लागतील. मात्र, त्यामध्ये आमचा पदाधिकारी दोषी असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल.” – शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप

महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गेल्या काही दिवसाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवि लक्ष्मण लांडगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची महापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशाली जालिंदर काळभोर आणि भारतीय जनता पक्षाच्या शर्मिला राजू बाबर यांचा प्रत्येकी १ असे एकूण २ अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी अर्ज माघारीसाठी देण्यात आलेल्या विहीत वेळेत वैशाली काळभोर यांनी अर्ज माघारी घेतल्याने शर्मिला बाबर यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड करण्यात आली. तसेच सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Police have registered a case against a bjp office bearer in pimpri chinchwad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • BJP
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
4

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.