Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar-Trimbak Highway: पालघर–त्र्यंबक १५४ किमी महामार्ग चौपदरी होणार; ३५०० कोटींचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

पालघर ते त्र्यंबक दरम्यानच्या १५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दा सध्या जिल्ह्यातील राजकारण व प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. महामार्ग विभागाने २ वेळा दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामेही केली.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 27, 2026 | 05:59 PM
Palghar-Trimbak Highway: पालघर–त्र्यंबक १५४ किमी महामार्ग चौपदरी; ३५०० कोटींचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात (फोटो-सोशल मीडिया)

Palghar-Trimbak Highway: पालघर–त्र्यंबक १५४ किमी महामार्ग चौपदरी; ३५०० कोटींचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Palghar-Trimbak Highway: पालघर ते त्र्यंबक दरम्यानच्या १५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दा सध्या जिल्ह्यातील राजकारण व प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेकडे असलेला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ८ वर्षांपूर्वी तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. महामार्ग विभागाने २ वेळा दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामेही केली.

‘पालघर ते मनोर’चा रस्ता चौपदरी करण्यात आला असून, मनोर ते त्र्यंबकपर्यंत सध्या १८ मीटर रुंदीपैकी ५ मीटर मुख्य रस्ता व २ मीटर साइड पट्टी आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २०२८ पर्यंत मनोर त्र्यंबक मार्ग चौपदरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून यासाठी तब्बल ३५०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याआधी १८०० कोटींचा अंदाज असलेला प्रकल्प खर्च वाढून ३५०० कोटींवर गेला आहे. मात्र, ३ए नोटिफिकेशन डिसेंबरमध्ये जाहीर करण्यात आले असले तरी ते गुप्त ठेवल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

विक्रमगड व जव्हार तालुक्यात ग्रामसभा न झाल्याची तक्रार असून पालघरमधील ग्रामसभेत उपस्थित अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती नसल्याचे सांगितले जाते. ग्रामीण भागातील जमिनींना शहरी भागाच्या तुलनेत कमी दर देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रुंदीकरणासाठी केवळ एकपट नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत असून, मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गाप्रमाणेच दर देण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर १५४ किलोमीटर परिसरातील सर्व गावांनी जाती-धर्म, पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये. जमिनी देऊन शेतकऱ्यांनी आधीच मोठा त्याग केला आहे. योग्य मोबदला मिळाला नाही तर आंदोलन अटळ आहे असे मत विश्वनाथ पाटील यांनी व्यक्त केले. बंदर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर वाईट वेळ आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. भांडवलदार कंपन्या भागात उतरून जमिनी बळकावत असल्याचा आरोप होत आहे. जमिनी भाडे तत्वावर देण्याच्या निर्णयामुळे शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. डोंगर नष्ट होण्याचा इशारा देत, “योग्य मोबदला न मिळाल्यास काम जिथून सुरू होईल तिथेच बंद पाडले जाईल असा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे.

वाढवण बंदरासाठी जाहीर केलेल्या दराचा दाखला देत, शासनाने चांगला दर द्यावा, अशी मागणी परशुराम चावरे यांनी केली. हुकूमशाही पद्धतीने निर्णय न घेता शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. जमिनीची मोजणी करताना शेतकऱ्यांची उपस्थिती व संमती आवश्यक आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. नोटिफिकेशननंतर जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार करूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप अविनाश पाटील यांनी केला.

संघटित राहून एकजूट कायम ठेवली तर अन्याय होणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, जबरदस्तीने शेतात प्रवेश करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून ओळखपत्र व तांत्रिक माहितीची मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा संघर्ष भडकावण्यासाठी नसून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

Web Title: Palghar tryambak 154 km highway four lane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • highway
  • palghar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.