Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashram Shala Audit Palghar : अनुदान लाटणाऱ्या आश्रमशाळा सरकारच्या रडारवर! होणार झाडाझडती; त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट सुरु

Ashram Shala Audit Palghar : आदिवासी आश्रमशाळांमधील गैरव्यवहार, निकृष्ट जेवण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एररणीवर आल्यानंतर राज्य शासनाने राज्यातील सर्व ५५८ अनुदानित आश्रमशाळांचे त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वंकष ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 09, 2026 | 11:50 AM
अनुदान लाटणाऱ्या आश्रमशाळा सरकारच्या रडारवर! ( सौजन्य - सोशल मीडिया )

अनुदान लाटणाऱ्या आश्रमशाळा सरकारच्या रडारवर! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आश्रमशाळाचा झाडाझडता
  • अनुदानित शाळांचे त्रयस्थ संस्थेमार्फत होणार ‘ऑडिट’
  • पालघर जिल्ह्यातील ६० आश्रमशाळा सरकारच्या रडारवर
Ashram Shala Audit Palghar : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे संशयास्पद मृत्यू, निकृष्ट दर्जाचे जेवण, सर्पदंशासारख्या दुर्घटना आणि शासकीय अनुदानाच्या गैरवापराच्या वाढत्या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व ५५८ अनुदानित आश्रमशाळांची झाडाझडती घेण्यासाठी स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) सर्वंकष ऑडिट करण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यास संस्थाचालकांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिला आहे. ( Ashram Shala Audit Palghar )

Illegal Firecracker Factory : विरारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यावर पोलिसांचा छापा! 3 जणांवर गुन्हा; 13 लाखांचा साठा जप्त

अनुदानित शाळांमध्ये निर्देशानंतरही सुधारणा नाही

राज्यात ५०० शासकीय तर ५५८ अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. एकट्या पालघर जिल्ह्यात शासकीय, एकलव्य आणि विनाअनुदानित अशा एकूण ६० आश्रमशाळांमधून शेकडो आदिवासी विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. शासकीय शाळांवर थेट प्रशासकीय नियंत्रण असले, तरी १०० टक्के अनुदान घेणाऱ्या अनेक अनुदानित शाळांमध्ये वारंवार निर्देश देऊनही सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्रयस्थ यंत्रणेद्वारे विद्यार्थ्यांची निवासव्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी, सुरक्षा आणि प्रत्यक्ष शैक्षणिक दर्जा तपासला जाईल. सोबतच शासनाकडून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या याचीही अनुदानाचा विनियोग कसा होतो, याचीही चौकशी होणार आहे.

जीवाशी खेळणाऱ्या संस्थाचालकांची गय नाही

ऑडिटच्या अहवालानंतर त्रुटी दूर करण्यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जाणार असून, आदिवासी संस्थाचालकांची गय केली जाणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे.

‘सेंट्रल किचन’बाबत अहवालानंतर निर्णय

विद्यार्थी संघटनांकडून वादात सापडलेली ‘सेंट्रल किचन’ प्रणाली बंद करण्याची मागणी केली जात असली, तरी ही व्यवस्था तत्काळ बंद केली जाणार नाही. याविषयी नेमलेल्या दोन समित्यांपैकी एका समितीचा अहवाल प्राप्त झाला असून दुसऱ्याचा अहवाल प्रलंबित आहे. तोपर्यंत आश्रमशाळा आणि स्वयंपाकघरामधील अंतर कमी करून विद्यार्थ्यांना १० ते २५ मिनिटांच्या आत ताजे व गरम जेवण पोहोचवण्याचे काटेकोर नियोजन केले जात आहे.

Nalasopara Police : रस्ते गिळणाऱ्या गॅरेजचालकांवर पोलिसांचा बडगा! नालासोपारात चार जणांविरोधात गुन्हे दाखल

Web Title: Ashram shala third party audit tribal development marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Ashram School
  • palghar

संबंधित बातम्या

Nilesh Sambare Case: राजकीय वैमनस्यातून दाखल केला ‘तो’ गुन्हा! नीलेश सांबरे प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे ताशेरे
1

Nilesh Sambare Case: राजकीय वैमनस्यातून दाखल केला ‘तो’ गुन्हा! नीलेश सांबरे प्रकरणात मुंबई हायकोर्टाचे ताशेरे

Varas Land Rights : बेदखल कुळांना मिळणार जमिनीचा हक्क! कूळ कायद्यात सुधारणेला तत्त्वतः मंजुरी; आदिवासी व कष्टकऱ्यांना मोठा दिलासा
2

Varas Land Rights : बेदखल कुळांना मिळणार जमिनीचा हक्क! कूळ कायद्यात सुधारणेला तत्त्वतः मंजुरी; आदिवासी व कष्टकऱ्यांना मोठा दिलासा

Jawhar PWD Scam : ‘बांधकाम ‘मधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश! अपहारप्रकरणी तिघांना अटक; कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी
3

Jawhar PWD Scam : ‘बांधकाम ‘मधील गैरव्यवहाराचा पर्दाफाश! अपहारप्रकरणी तिघांना अटक; कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी

राजकारणातील परिचित चेहरा हरपला; बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत काम, निष्ठावंत शिवसैनिक Shirish Chavan काळाच्या पडद्याआड
4

राजकारणातील परिचित चेहरा हरपला; बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्यासोबत काम, निष्ठावंत शिवसैनिक Shirish Chavan काळाच्या पडद्याआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.