Mumbai Ahmedabad Highway : उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलाला भेगा! कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही दर्जावर प्रश्नचिन्ह; कारवाईची मागणी

Mumbai Ahmedabad Highway : MMRDA च्या माध्यमातून काशीमिरा नाका ते मुंबई-अहमदाबाद महामार्ग जोडणाऱ्या आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ९ शी सुसंगत उड्डाणपुलाला वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच भेगा पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होऊनही बांधकामाच्या दर्जा व देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
( सौजन्य - सोशल मीडिया )
उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलाला भेगा! कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही दर्जावर प्रश्नचिन्ह
Published on: 
Updated on: 
  • Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणीबांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह

  • उद्घाटनापूर्वीच उड्डाणपुलाला भेगा

  • महामार्गावी कोट्यवधीचा सार्वजनिक निधी खर्च

Mumbai Ahmedabad Highway : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून काशीमिरा नाका ते मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या आणि मेट्रो मार्गिका क्रमांक ९ शी सुसंगत असलेल्या उड्डाणपुलाला वाहतुकीसाठी खुला होण्यापूर्वीच पीसीसी व काँक्रिटच्या पृष्ठभागावर लांबच लांब भेगा पडल्याचे समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च होत असताना सुरुवातीच्या टप्प्यातच अशी अवस्था निर्माण झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेसह देखरेख यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित करून कंत्राटदार व सल्लागारांना काळ्या यादीत टाकण्याची आक्रमक मागणी 'गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्ट'ने केली आहे.

( सौजन्य - सोशल मीडिया )
Harshwardhan Sapkal : वाढवण बंदर कायमचे रद्द करा! हर्षवर्धन सपकाळांची महायुती सरकारकडे मोठी मागणी

कामाची पडताळणी करण्याची मागणी

उड्डाणपुलाच्या बांधकामात मुरूम, सोलिंगचे दगड, जीएबीआय, पीसीसी आणि पीक्यूसी या विविध थरांचे साहित्य व निर्धारित जाडी मंजूर आराखड्यानुसार वापरली गेली आहे का, याबाबत ट्रस्टने संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष साइटवरील मोजमाप, काँक्रिट कोअर टेस्ट, थरांची जाडी तपासणी आणि साहित्याची प्रयोगशाळा चाचणी करून कामाची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच थर्ड पार्टी तपासणी यंत्रणा, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि संबंधित अभियंत्यांनी तयार केलेल्या गुणवत्ता अहवालांचीही स्वतंत्र चौकशी करावी, असे ट्रस्टने म्हटले आहे.

या प्रकरणी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, नगरविकास विभाग, दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभाग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

देयके रोखून शासनाच्या नुकसानीची वसुली करावी

चौकशी निष्पक्ष व्हावी व पुराव्यांवर प्रभाव पडू नये म्हणून संबंधित कार्यकारी अभियंता व देखरेख अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे. गैरव्यवहार किंवा संगनमत सिद्ध झाल्यास कंत्राटदार व सल्लागार कंपनीला काळ्या यादीत टाकून कंत्राटे रद्द करावीत, देयके रोखून शासनाच्या नुकसानीची वसुली करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी भूमिका ट्रस्टने मांडली आहे.

उ‌द्घाटनाच्या घाईपेक्षा नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन स्वतंत्र तांत्रिक परीक्षण, आवश्यक दुरुस्ती आणि तज्ज्ञांचे सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पूल खुला करू नये, असे ट्रस्टने स्पष्ट केले आहे.

( सौजन्य - सोशल मीडिया )
Vasai Virar Water Cut : वसई-विरारकरांवर पाणीकपातीचे सावट! पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेचे कठोर निर्बंध