Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara News Lizard In Cake : धक्कादायक! केकमध्ये आढळली पाल, नालासोपाऱ्यात खळबळ… 11 जणांची प्रकृती बिघडली

Nalasopara News Lizard In Cake : नालासोपारा पूर्वेकडील जिजाईनगर परिसरात केकमध्ये पाल आढळल्याने एकाच कुटुंबातील ११ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्रास होऊ लागल्याने सर्व ११ जणांना तातडीने विजय लक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 17, 2026 | 11:36 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • केकमध्ये आढळली पाल
  • नालासोपाऱ्यात माजली खळबळ
  • 11 जणांची प्रकृती बिघडली
Nalasopara News Lizard In Cake : नालासोपारा पूर्वेकडील जिजाईनगर परिसरात केक खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ११ जणांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केकमध्ये पाल आढळल्यानंतर संबंधितांना पोटदुखी आणि छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाल्याचे सांगण्यात आले. प्रकृती बिघडल्याने सर्वांना तातडीने नालासोपारा येथील विजय लक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व ११ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ( Nalasopara News Lizard In Cake ) 

Palghar News: चिखलेत समुद्रधूपचा वाढता धोका कायम! नवीखाडी, वडकतीपाडातील किनारा ढासळल्याने उद्भवली स्थिती

घटनेची माहिती मिळताच महापौर अजीव पाटील यांनी नगरसेविका सुमन काकडे आणि नगरसेवक विनोद जाधव यांच्यासह रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाकडून आवश्यक ती तपासणी केली जात आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक पाठवण्यात येणार असल्याची माहिती महापौर अजीव पाटील यांनी यावेळी दिली.

एफडीएच्या पथकाने केली दुकानाची तपासणी

केकमुळे विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने प्रथम विजयलक्ष्मी रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. त्यानंतर केक खरेदी करण्यात आलेल्या चामुंडा केक शॉपची तपासणी करण्यात आली. दुकानातील केक व अन्य खाद्यपदाथांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालघर अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्यंकटेश चव्हाण यांनी दिली.

स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले का?

संबंधित केक नेमका कुठून खरेदी करण्यात आला होता. तो तयार करताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का आणि कैकमध्ये पाल कशी आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तपासणीनंतरच स्पष्ट होणार प्रकृती बिघडण्याचे कारण

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या तपासणीनंतरच केकच्या गुणवत्तेबाबत आणि रुग्णांच्या प्रकृती बिघडण्यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सध्या सर्व ११ रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

Web Title: Nalasopara news lizard in cake food poisoning 11 people ill fda investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 11:36 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.