Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara Police : रस्ते गिळणाऱ्या गॅरेजचालकांवर पोलिसांचा बडगा! नालासोपारात चार जणांविरोधात गुन्हे दाखल

Nalasopara Police :नालासोपारा पश्चिमेकडील वर्दळीच्या रस्त्यांवर दुरुस्तीसाठी आणलेली वाहने अस्ताव्यस्त उभी करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या चार बेजबाबदार गॅरेजचालकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 08, 2026 | 04:38 PM
वाहने अस्ताव्यस्त उभी करून वाहतुकीचा अडथळा ( सौजन्य - Chatgpt )

वाहने अस्ताव्यस्त उभी करून वाहतुकीचा अडथळा ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • चार जणांविरोधात गुन्हे दाखल
  • वाहने अस्ताव्यस्त उभी करून वाहतुकीचा अडथळा
  • रस्ते अडवणाऱ्या गॅरेजचालकांवर बडगा
Nalasopara Police : नालासोपारा पश्चिमेकडील वर्दळीच्या रस्त्यांवर दुरुस्तीसाठी आणलेली वाहने अस्ताव्यस्त उभी करून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या बेजबाबदार गॅरेजचालकांविरोधात अखेर नालासोपारा पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. सार्वजनिक रस्त्यांवर बेकायदा कब्जा करणाऱ्या चार गॅरेजचालकांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Nalasopara Police ) 

Gold Prices Global Vs India : जगभरात तब्बल 24% तर घसरले सोन्याचे भाव! मग भारतात फक्त 20% घसरण का? या फरकामागचं मोठं कारण समोर

रस्त्यावरच वाहने उभी करून दुरुस्तीची दुकाने थाटली

वसई-विरार महापालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. नालासोपारा पश्चिमेतील गजबजलेला फोर्थ रोड, श्रीप्रस्थ म्हाडा परिसर, सोपारा स्टेशन रोडवर अनेक गॅरेजचालकांनी रस्त्यावरच वाहने उभी करून दुरुस्तीची दुकाने थाटली होती. याप्रकरणी पोलिसांनी चार गुन्हे नोंदवले आहेत.

विरोधी पक्षनेते मनोज पाटलांची काय भूमिका?

यामध्ये श्रीप्रस्थ म्हाडा रोडवरील ‘हुरेन गॅरेज’चे चालक-मालक रुहान हनिफ मेमन, ‘विवेक ऑटो पार्ट्स’चे चालक मालक सचिन दीपक नाईक आणि सोपारा स्टेशन रोडवरील ‘ब्रिटो गॅरेज’चे चालक-मालक इरफान मोहम्मद मुसा अन्सारी यांच्यासह एका संबंधित व्यक्तीचा समावेश आहे. पोलिसांनी गुन्हे नोंदवून कारवाईची सुरुवात केली असली, तरी केवळ एफआयआर नोंदवून रस्ते मोकळे होणार नाहीत, अशी भूमिका विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी घेतली आहे.

जीव मुठीत धरून गर्दीतून मार्गक्रमण

या परिसरातील गॅरेजचालकांनी पदपथ आणि रस्ते व्यापल्याने स्थानिक नागरिक हैराण झाले होते. रस्त्यांवरच वाहने उभी राहिल्याने आधीच अरुंद रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत होती. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला थेट शेड उभारून अतिक्रमण करण्यात आल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून वाहनांच्या गर्दीतून चालावे लागत होते. यामुळे अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता.

Diwali Muhurat Trading 2026 : शेअर बाजारावर लक्ष्मीची कृपा! दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स चमकले?

💡

Frequently Asked Questions

  • Que: नालासोपारात पोलिसांनी किती गॅरेजचालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत?

    Ans: सार्वजनिक रस्त्यांवर आणि पदपथांवर अतिक्रमण करून वाहने अस्ताव्यस्त उभी करणाऱ्या चार गॅरेजचालकांविरुद्ध नालासोपारा पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

  • Que: कारवाईमध्ये कोणकोणत्या गॅरेज आणि चालकांचा समावेश आहे?

    Ans: यात 'हुरेन गॅरेज'चे मालक रुहान हनिफ मेमन, 'विवेक ऑटो पार्ट्स'चे मालक सचिन दीपक नाईक, 'ब्रिटो गॅरेज'चे मालक इरफान मोहम्मद मुसा अन्सारी यांच्यासह एका संबंधित व्यक्तीचा समावेश आहे.

  • Que: कारवाई कोणत्या भागांत आणि कोणाच्या पाठपुराव्यामुळे झाली?

    Ans: फोर्थ रोड, श्रीप्रस्थ म्हाडा परिसर आणि सोपारा स्टेशन रोडवर ही कारवाई झाली असून, वसई-विरार महापालिकेचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पोलीस व प्रशासन खडबडून जागे झाले.

Web Title: Nalasopara police action against garage owners illegal parking marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:38 PM

Topics:  

  • Cyber ​​police
  • Nalasopara

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.