
पालघरमध्ये लघु उद्योजकाची सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
नक्की काय घडले?
गरजू लघुउद्योजक, शेतकरी, बागायतदार यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आपल्या व्यवसाय वाढीसाठी कर्जाची गरज भासते. मात्र सरकारी आणि खाजगी बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी अनेक जाचक अटी आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्यामुळे जंगम स्थावर मालमत्तेच्या आधारावर तसेच सोने व स्वतःची वाहने यांना तारण ठेवून लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांना मासिक १५ ते २० टक्के व्याजाने अवैध खाजगी सावकारांकडून नाईलाजाने कर्ज घेण्याची वेळ येते .
लघुउद्योजक आणि शेतकऱ्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत खाजगी सावकार त्यांच्याकडून चक्रवाढ व्याज आकारून वसुली करतात . कर्जाचा हप्ता भरण्यास काही कारणांमुळे विलंब झाल्यास सूट न देता गुंड प्रवृत्तीच्या माणसांद्वारे कर्जदार आणि त्याच्या कुटुंबाकडून जुलूम जबरदस्ती करून वसुली केली जाते . तसेच सार्वजनिक ठिकाणी नातेवाईक मित्रमंडळी आणि ओळखीच्या नागरिकांसमोर दमदाटी करून अपमानित केले जाते . घेतलेल्या कर्जाच्या मूळ रकमेपेक्षा त्यावरील भरमसाठ व्याज भरण्यातच कर्जदार मेटाकुटीला येत आहेत .
सावकार घालत आहेत संपत्ती घशात
चिंचणी तारापूरसह आजूबाजूच्या परिसरातील डायमेकर , शेतकरी , बागायतदार आणि इतर लघुउद्योजक व्यावसायिकांनी कष्टरूपाने कमावलेली आपली मालमत्ता आणि सोनेरुपी प्रतीक अनधिकृत खाजगी सावकारांचे आकाश गिळंकृत करत आहेत . अशा अवैध विनापरवाना खाजगी सावकारीचा अवैध धंदा करणाऱ्या विरोधात पोलीस नेमकी काय कारवाई करणार आहेत याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे . तसेच खाजगी सावकारीच्या जाचाने त्रस्त असलेल्या पिडीतानी टोकाचे पाऊल न उचलता सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार दाखल करून पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन पालघर पोलिस दलाने केले आहे .