पालघर: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी घडू लागल्या आहेत. अशातच शिंदे गटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा गेल्या 17-18 तासांपासून नॉटरिचेबल असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाच्या मिटींगनंतर ते कारमध्ये बसून कुठेतरी निघून गेले तेव्हापासून त्यांचा फोनही बंद येत आहे. त्यानंतर पालघर पोलिसांनी श्रीनिवास वनगा यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटपात श्रीनिवास वगना यांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊ ते कुठेतरी निघून गेले आहेत. त्यांची नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीशी बोलून श्रीनिवास यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे आश्वासन कुटुंबीयांना दिले.
शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना महाराष्ट्रातील पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती, मात्र सोमवारी (28 ऑक्टोबर) या जागेवरून दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्याने वनगा दु:खी झाले. तिकीट कापल्यावर तर ते अक्षरश: रडायला लागले होते. एकना शिंदे यांच्या शिवसेनेने राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपला विश्वासधात केल्याचा आरोही वनगा यांनी केला होता.
हेही वाचा: ‘वॉर्नर म्युझिक इंडियासोबतच्या हातमिळवणी नंतर आता रॅपर कर्माने केली “द वॉर्म अप टूर”
नाराज श्रीनिवास यांनी शिंदे यांच्यावर आरोप केला की, बंडाच्या वेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या 40 पैकी 39 आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे, मात्र त्यांनाच तिकीट दिले गेले नाही. पण श्रीनिवास यांचेच तिकीट कापण्यात आले. त्यामुळे श्रीनिवास हे डिप्रेशनमध्ये गेले आहेत. रविवारपासून त्यांनी जेवण केले नाही. ते सतत रडत होते. ते आत्महत्या करण्याबाबतही बोलत होते. असे त्यांच्या पत्नीने सांगितले. तसेच. उद्धव ठाकरेंसारख्या दैवताला सोडून जाणं ही त्यांच्या कुटुंबाची मोठी चूक असल्याचं त्यांच्या पत्नीने म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीशी चर्चा केली. वनगा यांच्या पत्नीने सांगितले की शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांना आपण डहाणू विधानसभा लढवणार असल्याचे सांगितले होते, परंतु तेथूनही उमेदवारी देण्यात आली नाही. त्यावेळी त्यांना पालघरमधून उमेदवारी दिली जाईल, असे वाटले होते, मात्र तेथेही त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. सध्या लोकांची वेगवेगळी मते आहेत. लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. श्रीनिवास वनगा यांना विधान परिषदेवर पाठवू, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
हेही वाचा: Maharashtra Election 2024: वडगाव शेरीत भाजपच्या जगदीश मुळीकांचा यू-टर्न; देवा भाऊं