Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : “आता नवी औद्योगिक क्रांती, महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही…”, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 26, 2026 | 06:04 PM
Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर 'या' बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर 'या' बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे. विकास आणि लोककल्याणाची महाराष्ट्राची ही विकासयात्रा कधीही थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचे सावट असून त्यांनी नेहमी विकासाचे राजकारण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता ‘सुनेत्रापर्व’; NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

राज्याच्या औद्योगिक प्रगतीविषयी सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे केवळ देशातीलच नव्हे तर जगाच्या पातळीवर गुंतवणुकीसाठी पसंतीचे राज्य बनले आहे. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात नंबर वन असून देशाच्या एकूण जीडीपीमध्ये राज्याचा वाटा १३.५ टक्के आहे. २०२४-२५ या वर्षात महाराष्ट्राला १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक मिळाली, जी देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या तब्बल ३९ टक्के आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातही ९१ हजार ३३७ कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून परकीय गुंतवणुकीत राज्य प्रथम क्रमांकावर आहे. दावोसमध्ये १८ देशांतील कंपन्यांशी सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे रेकॉर्डब्रेक सामंजस्य करार झाले असून त्यापैकी ८२ टक्के करार अंमलबजावणीच्या टप्प्यावर आहेत. या गुंतवणुकीतून क्वांटम कम्प्युटिंग, एआय, सेमीकंडक्टर्स आणि ग्रीन एनर्जी यांसारख्या आधुनिक क्षेत्रांत मोठी कामे होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसह संपूर्ण राज्याचा चेहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. मुंबईत आशियातील सर्वात मोठे ‘जागतिक क्षमता केंद्र’ उभारले जाणार असून त्यातून ४५ हजार रोजगार निर्माण होतील. पालघरमधील वाढवण बंदर हे जेएनपीटीच्या तिप्पट क्षमतेचे असून तो एक ‘गेमचेंजर’ प्रोजेक्ट ठरेल, ज्यामुळे ४० लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्माण होतील. याशिवाय समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांमुळे राज्याची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. केवळ मुंबई-पुण्यापुरता विकास मर्यादित न ठेवता औद्योगिक विकासाचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. उत्तर महाराष्ट्रात ५० हजार कोटींची, तर अहिल्यानगर जिल्ह्यात ११ हजार ५१९ कोटींची गुंतवणूक येत आहे. छत्रपती संभाजीनगर हे देशातील पहिले स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी असून ते भविष्यातील ईव्ही उत्पादनाचे मोठे केंद्र असेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील तरुणांच्या रोजगाराबाबत घोषणा करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, २०२६ हे वर्ष ‘भरती वर्ष’ म्हणून राबवले जाणार आहे. यापूर्वी ७५ हजार रिक्तपदांची मोहीम राबवून आतापर्यंत १ लाख ५३ हजार पदांपैकी ८५ हजार ३६३ उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. सरकारी आणि खासगी अशा दोन्ही क्षेत्रांत नोकऱ्यांची मोठी संधी निर्माण केली जात असून संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनात आमूलाग्र बदल करण्यासाठी ‘जीपीआर २.०’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून त्याचे कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. आमचे सरकार २४ तास जनतेच्या सेवेत असून महाराष्ट्राच्या प्रगतीची गाडी सुसाट सुटली आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्राला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम आम्ही केले असून विकासाची यात्रा आता थांबणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईतील ‘या’ पुलाचे नामकरण, आता ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ असे करणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Web Title: Now the new industrial revolution maharashtra development journey will not stop assures the deputy chief ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • state government

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
1

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका
2

Uddhav Thackeray : ‘धनुष्यबाण चिन्ह गोठवा,’ उद्धव ठाकरेंची मोठी मागणी; DJ च्या गोंगाटावरही मांडली स्पष्ट भूमिका

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी
3

Rohit Pawar On Gunaratna Sadavarte:’सदावर्ते गाढविणीचं दूध पितात, त्यांची बुद्धीही तशीच’; रोहित पवारांची गुणरत्न सदावर्तेंवर जहरी

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण
4

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.