वडगाव शेरीमधून मुळीकांची माघार (फोटो- ट्विटर)
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान अनेक इच्छुकाना यंदाच्या निवडणुकीत पक्षाकडून आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अनेकांचा हिरमोड झाला आहे. काही उमेदवारांनी तर पकसनत्र करून किंवा अपक्ष अर्ज दाखल करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील अनेक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होताना पाहायला होईल असे वाटत होते. दरम्यान आता पुण्यातील चर्चेत असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघात देखील मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार होती. जगदीश मुळीक विरुद्ध सुनील टिंगरे अशी ही लढत होण्याची शक्यता होती. मात्र आता जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जय ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल ती जागा त्या पक्षाला देण्याचा एक सूत्र महायुतीने ठरवल्याचे म्हटले जाते. दरम्यान त्यानुसार वडगाव शेरीमध्ये टिंगरे यांना तिकीट देण्यात आले. मात्र भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र आता जगदीश मुळीक देखील निवडणूक लढणार होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबवल्याचे मुळीक यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर देखील भाजपने या जागेवरील दावा सोडला नव्हता. भाजपने ही जागा लढवावी असे कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे मुळीक यांचे मत होते. तास भाजप या जागेसाती आग्रही होताच. मात्र वडगाव शेरीमध्ये महायुतीमध्ये बिघडी होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने जगदीश मुळीक यांना देखील एबी फॉर्म दिल्याचे समजते आहे. यानंतर जगदीश मुळीक देखील आपला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता होती. मात्र आता मुळीक यांनी माघार घेतली आहे. तर कार्यकर्त्यांकडून अर्ज भरण्यासाठी घोषणा केली जात आहे.
सुनील टिंगरे हे वडगाव शेरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कल्याणीनगर अपघातामध्ये त्यांचे नाव आल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली जाणार की नाही अशी राजकीय चर्चा सुरू झाली होती. मात्र महायुतीने आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुन्हा एकदा सुनील टिंगरे या विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली आहे. भाजप या जागेसाठी आग्रही होता. मात्र टिंगरे यांना उमेदवारी दिल्याने मुळीक नाराज असल्याची चर्चा होती.
हेही वाचा: युगेंद्र पवारांच्या प्रचाराला आरंभ! भाच्यासाठी आत्या मैदानात; सुप्रिया सुळेंची तुफान टोलेबाजी
महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. शिवसेनेशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या महाआघाडीत समावेश आहे. दुसरीकडे, विरोधी आघाडी एम.व्ही.ए. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी), ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांचा समावेश आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलायचे तर, भाजपने १६५ उमेदवार उभे केले होते आणि १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला होता.