बांगलादेशी चोरांकडून लाखोंच्या दागिन्यांसह विदेशी डॉलर्स जप्त ( सौजन्य - सोशल मीडिया )
पोलिस उपायुक्त (परिमंडळ-२) अशोक विरकर, सहायक पोलिस आयुक्त देवेंद्र पोळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सौरभी पवार व पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यांपावरीक्षक दिशाखाकार पोलिस हवालदार मुकेश तटकरे, प्रशांत पाटील, सूर्यकांत मुंढे, आप्पासाहेब गर्जे, प्रशांत आहेर, सौरभ दराडे, अक्षय नांदगावकर आणि दीपक भांगडे या पथकाने ही कारवाई केली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. संशयित आरोपी वांद्रे-माहीम कॉजवे परिसरातील फुटपाथवर राहत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून मोहम्मद निजाम मोहम्मद तासीर शेख (वय ४४) आणि जहांगीर शुकरअली शेख (वय ४०) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी घरफोडीची कबुली दिली. हे दोघेही पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्याचे बनावट पत्ते सांगत असले तरी, ते मूळचे बांगलादेशातील घुसखोर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी मोहम्मद निजाम याच्यावर यापूर्वी तब्बल ७ गंभीर गुन्हे, तर जहांगीरवर १ गुन्हा दाखल आहे. चोरीचा माल त्यांनी माहीम येथील दत्तात्रय काशिनाथ कोळी (वय ५२, व्यवसाय इलेक्ट्रिशियन) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी दत्तात्रयलाही अटक केली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि विदेशी अमेरिकन डॉलर्स असा ६ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वसई पश्चिमेकडील गिरीज, सादोडावाडी येथील ‘मॅथ्यू स्मृती’ बंगल्यात राहणाऱ्या जोस्पीन मॅथ्यू मार्टिन (वय ६७) या वृद्ध महिला घराबाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ३ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास करून चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Ans: पोलिसांनी वांद्रे-माहीम कॉजवे परिसरातील फुटपाथवरून मोहम्मद निजाम मोहम्मद तासीर शेख आणि जहांगीर शुकरअली शेख या दोन बांगलादेशी घुसखोर चोरट्यांसह चोरीचा माल खरेदी करणारा दत्तात्रय काशिनाथ कोळी याला अटक केली आहे.
Ans: आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि परदेशी अमेरिकन डॉलर्स असा एकूण ६ लाख ६८ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Ans: वसई पश्चिमेकडील गिरीज, सादोडावाडी येथील एका बंगल्यात राहणाऱ्या ६७ वर्षीय वृद्ध महिला घराबाहेर गेल्या असताना चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि ३ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबवला होता.






