Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar महापालिकेचा मोठा निर्णय! आता कंत्राटदारांऐवजी तृतीयपंथी, महिला बचत गटांच्या हाती ‘क्लीनअप मार्शल’ची धुरा

Vasai Virar Municipal Corporation Decision : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि कचरा फेकणाऱ्या नागरिकांना चाप लावण्यासाठी वसई-विरार महापालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंत्राटदारांमार्फत क्लीनअप मार्शल नियुक्त करण्याची पारंपरिक पद्धत बंद केली. ही धुरा तृतीयपंथी आणि महिला बचत गटांच्या हाती दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 07, 2026 | 11:15 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Vasai Virar महापालिकेचा मोठा निर्णय!
  • तृतीयपंथी, महिला बचत गटांच्या हाती ‘क्लीनअप मार्शल’ची धुरा
  • नियुक्त कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण
Vasai Virar Municipal Corporation Decision : सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणारे, धुंकणारे आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना चाप लावण्यासाठी वसई-विरार महापालिकेने आता तृतीयपंथी आणि महिला बचत गटांच्या हाती स्वच्छतेची धुरा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंत्राटदारामार्फत क्लीनअप मार्शल नियुक्त करण्याची पारंपरिक पद्धत बाजूला सारत महापालिका स्वतःच्या माध्यमातून ही नियुक्ती करणार आहे. तृतीयपंथीयांना रोजगाराची संधी देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या निर्णयातून करण्यात आला आहे. ( Vasai Virar Municipal Corporation Decision ) 

Vasai Virar Garbage Scam : महापालिकेत 64 कोटींचा कचरा घोटाळा? आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे गंभीर आरोप; तपासावरून प्रश्न

शहरात नियमित स्वच्छता केली जात असतानाही अनेक नागरिकांकडून रस्त्यावर कचरा फेकणे, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडणे, रस्त्यालगत कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून रोगराई पसरण्याची आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महासभेने घनकचरा अधिनियम २०२६ चो प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्लीनअप मार्शल नियुक्तीचा ठराव बहुमताने मंजूर केला आहे. वसई-विरारमधील सर्व नऊ प्रभागांमध्ये वलीनअप मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. आगामी तीन वर्षाच्या कालावधीसाठी हा उपक्रम राबवला जाणार असून, तृतीयपंथींसाठी सुरुवातीला एक वर्ष प्रायोगिक तत्त्वावर काम दिले जाणार आहे.

नियुक्त कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

या निविदेत तृतीयपंथीसाठी ३३ टक्के प्राधान्य ठेवण्यात आले असून उर्वरित संधी महिला बचत गट आणि अन्य पात्र घटकांना दिली जाणार आहे. तृतीयपंथीयांच्या नोंदणीकृत संस्थांनाही या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. नियुक्त कर्मचा-यांना महापालिकेकडून विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून गणवेश, ओळखपत्र आणि सुरक्षा साहित्याचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. वलीनअप मार्शलची जबाबदारी केवळ दंडात्मक कारवाईपुरती मर्यादित न ठेवता स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार आहे.

आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणाचा उद्देश

तृतीयपंथीयांना सन्मानपूर्वक रोजगार उपलब्ध करून देत त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. असे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले, तर नियुक्त्या पात्रतेचे निकष तपासून पारदर्शक पद्धतीने करण्यात येतील, असे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी स्पष्ट केले.

तृतीयपंथियांना सन्मानजनक रोजगार

तृतीयपंथीयांना अशा प्रकारे महापालिकेच्या कामकाजात सहभागी करून घेण्याचा प्रयोग यापूर्वी कटक महापालिकेने २०१९ मध्ये केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०२२ मध्ये तृतीयपंथींना ग्रीन मार्शल आणि सुरक्षा रक्षक म्हणून संधी दिली होती. आता वसई-विरारमध्ये स्वच्छतेसोबतच तृतीयपंथींच्या सन्मानजनक रोजगाराचा नवा अध्याय सुरू होणार आहे.

Vasai Tehsildar Office : पालिकेच्या नोटिसीला तहसीलचा ठेंगा! मुदत उलटूनही धोकादायक इमारतीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल नाही

Web Title: Vasai virar municipal corporation appoints transgenders as cleanup marshals marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Municipal Corporation
  • Transgender
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Vasai Virar Garbage Scam : महापालिकेत 64 कोटींचा कचरा घोटाळा? आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे गंभीर आरोप; तपासावरून प्रश्न
1

Vasai Virar Garbage Scam : महापालिकेत 64 कोटींचा कचरा घोटाळा? आमदार स्नेहा दुबे पंडित यांचे गंभीर आरोप; तपासावरून प्रश्न

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई
2

Vasai Virar Garbage Scam : 957 कोटींच्या कचरा कंत्राटाचा फैसला आता नगरसेवकांच्या हाती! दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक
3

Vasai Virar Water Tax Hike : अपुरा पाणीपुरवठा अन् वाढीव पाणीपट्टी! महासभेत सत्ताधारी-विरोधक भिडले; भाजप आक्रमक

Vasai Virar Roads : दरवर्षी कोट्यवधींचे ‘पॅचवर्क’, मग काँक्रिटचे रस्ते कधी? वसई-विरारकरांचा पालिकेला संतप्त
4

Vasai Virar Roads : दरवर्षी कोट्यवधींचे ‘पॅचवर्क’, मग काँक्रिटचे रस्ते कधी? वसई-विरारकरांचा पालिकेला संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.