
वसईकरांची दिवाळी गोड होणार! ( सौजन्य - सोशल मीडिया )
वसई-विरार हे मुंबई व ठाण्याला लागून असलेले प्रमुख उपनगर असल्याने येथे नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे. सध्या महापालिकेकडे असलेल्या १२० बसेसपैकी अवघ्या ४० ई-बसेस प्रत्यक्ष सेवेत असून, ३६ विविध मार्गावरून दररोज ६५ हजारांहून अधिक नागरिक प्रवास करतात. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांची संख्या तोकडी असल्याने गर्दीच्या वेळी बसेसमध्ये अक्षरशः पाय ठेवायलाही जागा गणेशोत्सवासारख्या सणांमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन, नादुरुस्त बसेस आणि खड्यांमुळे प्रवासी वाहतूक अनेकदा विस्कळीत झाली होती. या पार्श्वभूमीवर नवीन बसेसची प्रतीक्षा दीर्घकाळापासून होती.
केंद्र शासनाने नेमलेल्या ‘जेबीएम’ या पुरवठादार कंपनीसोबतच्या कायदेशीर करारातील अटी-शर्ती आणि तांत्रिक बाबीमुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या या बसेस रखडल्या होत्या. आता सर्व प्रशासकीय अडसर दूर झाले असून पहिल्या टप्प्यातील ४० बसेस रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज होत आहेत. या नव्या गाड्यांमुळे प्रवासी भार असलेल्या मार्गावर फेऱ्या वाढवणे आणि वंचित राहिलेल्या अंतर्गत भागांत नवीन मार्ग सुरू करणे शक्य होणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी स्पष्ट केले.
या बसेसच्या चार्जिंग, पार्किंग आणि तांत्रिक देखभालीसाठी नवघर (वसई) व नालासोपारा येथे अत्याधुनिक ई-बस आगारांची उभारणी सुरू आहे. या प्रकल्पासाठी शासनाचा २७, १७ कोटी आणि महापालिकेचा १० कोटी असा एकूण ३७.१७ कोटींचा निधी खर्ची पडत आहे. या डेपोंचे काम ९० ते ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तोपर्यंत या ४० बसेस विरार महापालिका मुख्यालयालगतच्या आगारातून तात्पुरत्या स्वस्ख्यात संचलित केल्या जाणार आहेत. या नव्या सेवेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम व पर्यावरणस्नेही होणार आहे.
Ans: केंद्र सरकारच्या 'पीएम ई-बस सेवा' योजनेंतर्गत मंजूर झालेल्या १०० बसेसपैकी पहिल्या टप्प्यात तब्बल ४० अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस महापालिकेच्या ताफ्यात येत आहेत.
Ans: या बसेसच्या देखभालीसाठी नवघर (वसई) आणि नालासोपारा येथे अत्याधुनिक ई-बस आगारांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.
Ans: प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल, प्रमुख मार्गांवर फेऱ्या वाढतील आणि ग्रामीण किंवा अंतर्गत वंचित भागांत नवीन बसमार्ग सुरू करणे शक्य होईल.