
विरोधी पक्षनेते यांचा पालिका आयुक्तांना इशारा ( सौजन्य - सोशल मीडिया )
NDRF जवानांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘प्रोजेक्ट निर्मल’; जवानांसह कुटुंबीयांनाही मिळणार आधार
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे यांसारख्या महापालिकांमध्ये आगामी वर्षाच्या नालेसफाईचे सर्वेक्षण व निविदा प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यातच सुरू होते. यामुळे निकोप स्पर्धा निर्माण होऊन कंत्राटदारांना गाळ काढण्यासाठी व वाहून नेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, परिणामी कामाचा दर्जा राखला जातो. मात्र, वसई-विरार महापालिकेत दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात ऐनवेळी घाईघाईने निविदा काढल्या जातात अथवा वेळेअभावी मर्जीतील कंत्राटदारांना मुदतवाढ दिली जाते. या नियोजनशून्य कारभारामुळे केवळ कागदावरच सफाई दाखवली जात असून यंदा शहराला जलमय परिस्थितीचा सामना करावा लागला, ज्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल आणि आर्थिक नुकसान झाले.
जुन्या कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याची पद्धत बंद करून प्रत्येक नाल्याची लांबी, रुंदी, गाळाचे प्रमाण आणि मंजूर निधी सार्वजनिक करावा. कामात पारदर्शकता राखण्यासाठी जिओ-टंग छायाचित्रण, व्हिडिओग्राफी बंधनकारक करून गाळाच्या वाहतुकीची ऑनलाइन नोंद ठेवावी व स्वतंत्र तांत्रिक विभागामार्फत तपासणी व्हावी, अशा सूचना पाटील यांनी केल्या आहेत.
नालेसफाईतील ही अपारदर्शकता संपवण्यासाठी इतर महापालिकांच्या धर्तीवर प्रभागनिहाय खुली ई-निविदा प्रक्रिया ऑक्टोबरमध्येच सुरू करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. प्रशासनाने या मागण्यांची दखल घेऊन वेळापत्रक जाहीर न केल्यास सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन व कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
GST Councilचा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा; अधिकाऱ्यांचे अटकेचे अधिकार रद्द, सामान्य दंडही घटला