
Pandharpur vineyard harvesting and crop pruning Solapur News Update
नवनाथ खिलारे : पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक बागायतदार द्राक्ष पिकांच्या ऑक्टोंबर पीक किंवा फळ छाटणी करण्यात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात द्राक्ष बागांच्या ऑक्टोंबर छाटणीची धांदल उडालेली दिसून येते आहे.तालुक्यातील सर्वच भागातील गावांत द्राक्ष बागांच्या शेवटच्या किंवा मागास छाटण्या सर्वत्र सुरू आहेत. कासेगाव पासून करकंबपर्यंत व भाळवणी, सरकोली अग्रण खर्डी पर्यंत उजणी योजनेच्या कालव्याच्या परिसरातील गावांमध्ये आणि तनाळी, भैरवनाथ वाडीपासून पुळूजपर्यंतच्या अग्रण नदीच्या काठावरील परिसरातील गावांत कासेगाव येथील सुरेश ठिकोरे यांच्या द्राक्ष बागेत काव पेस्ट लावण्याचे काम सुरू आहे.
शेतीच्या पाण्याची खात्रीशीर उपलब्धता झाल्याने गेल्या दहा पंधरा वर्षात द्राक्ष बागेचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच तालुक्याच्या माळराना वरील कासेगाव पासून गोपाळपूर, करकंब, भाळवणी परिसरातील गावांत व तनाळी, खर्डी व शेटफळ परिसरात द्राक्षबागेचे क्षेत्र आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागांचे क्षेत्र सुमारे ११ हजार १११ हेक्टर आहे. सन २०२४-२५ कालावधीत सुमारे ५७० हेक्टर द्राक्ष बागाचे क्षेत्र कमी झाले आहे. यावर्षी पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पीक किंवा फळ छाटणीच्या संकटात सापडला आहे.
छाटणीचा हंगाम मजुरांना फायद्याचा
तालुक्यातील सर्वच भागातील गावांत द्राक्ष बागांच्या ऑक्टोंबर पीक छाटणीची धांडल उडाली आहे. सध्या द्राक्ष बागेत पाला काढणे, छाटणी करणे, पेस्ट लावणे व वांझ काढणे व खोडं धुवून घेणे ही कामे सध्या सुरू आहेत. ही कामे मजूर ठरवून केली जात असतात. फक्त छाटणीचा हंगाम शेतमजूरांना फायदेशीर ठरत असतो. दिवाळी सणातही शेतमजूरांनी सुट्टी घेतली नाही. लक्ष्मी पूजन, पाडवा व भाऊबीज यावेळीही द्राक्ष बागांच्या ऑक्टोंबर छाटणी सुरू होत्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शेवटच्या तारखेपर्यंत ऑक्टोबर छाटण्या सुरू राहणार
महिन्यातील पीक छाटण्या सततच्या पावसामुळे घेण्यात आल्या नाहीत. ५ ते ७ टक्के ऑगस्ट महिन्यात तर १५ ते १७ टक्के सप्टेंबर महिन्यात झालेल्या आहेत. सुमारे ७५ टक्के ते ८० छाटण्या ऑक्टोंबर महिन्यात घेतल्या जात आहेत. अजून सुमारे २० ते २५ टक्के ऑक्टोंबर महिन्यातील छाटण्या करावयाच्या आहेत. अजून तालुक्यातील सर्वच भागातील गावांत सुमारे ७५ ते ८० टक्के द्राक्ष पीक छाटण्या ऑक्टोंबर महिन्यात घेतल्पा गेल्या आहेत. ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑक्टोबर छाटण्या सुरू राहणार आहेत. त्यामुळे शेतीतील खरीप हंगामातील पिकांची काढणी, खुडणी व मळणीसाठी मजूरांची टंचाई जाणवू लागली आहे.