डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले चार प्रश्न (फोटो - सोशल मीडिया)
Satara Doctor Death Case: पुणे: फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक दावे समोर आले आहेत. संपदा मुंडे यांनी हातावर सुसाईड नोट लिहित जीवन संपवलं. त्यांच्यावर व्यवस्थेचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचा आरोप केला जात आहे. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक दावा केला आहे. सुषमा अंधारे यांनी चार प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येसाठी रणजीत निंबाळकर जबाबदार असल्याचा आरोप उपनेत्या सुषमा अंधारेंनी यांनी व्यक्त केला. फिजिकली फिट आणि अनफिट ठरवण्याचा अधिकार वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या हातात असताना, रणजीत निंबाळकर हे त्यांच्यावरती दबाव आणत होते. रणजीत निंबाळकर यांनी फिजिकली फिट असण्यासाठी दबाव आणला. तसेच रणजीत निंबाळकर यांनी पोलिसांनी हाताशी धरून त्यांनी तक्रारी केल्या आहेत.निंबाळकर हे चौकशीच्या कक्षेत आले पाहिजे. रणजीत निंबाळकर चौकशीच्या कक्षात आलेच पाहिजे. त्यांनी बीडच्या लोकांवर होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत ती बीडची आहे म्हणून तिचा जीव घेतला गेला, असा नवीन बॉम्ब सुषमा अंधारे यांनी टाकला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुसाईट नोट गायब झाली?
डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूच्या कारणाबद्दल देखील सुषमा अंधारे यांनी संशय व्यक्त केला आहे. तसेच सुसाईट नोटबाबत खळबळजनक सवाल केला आहे, संपदा मुंडेंनी आत्महत्या केली का तिची हत्या करण्यात आली? आमचा दाट संशय आहे की संपदा मुंडे ची हॉटेलवर नेऊन हत्या करण्यात आली. सुसाईट नोट गायब झाली आहे का? ती मुलगी चार पानाचं पत्र लिहू शकते, ती हातावर का लिहेल? सुसाईट नोट गायब झाली आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
पुढे सुषमा अंधारे यांनी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. वैष्णवी हगवणेच चारित्र्य जसं हनन करण्यात आले त्याच पद्धतीने संपदाच सुद्धा चारित्र्य हनन केले जात आहे. जय कुमार गोरेवर सुद्धा एका महिलेने आधी आरोप केले होते. ज्या व्यक्तीच्या हॉटेलवर ती गेली होती त्याचं फोटो जयकुमार गोरे सोबत आहेत. बदने आणि बनकर या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख करून दिशाभूल केली जात आहे का, असाही सवाल त्यांनी केला. मी कधीही जातीच राजकारण करत नाही. नातेवाईक आले नसताना मृतदेह का उचलला गेला, असा प्रश्न देखील सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.






