बीड : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावुक झाल्याचं पाहायला मिळाल्या. कुटुंबाला एकत्र ठेवणे हे भाग्य सर्वांच्या नशिबी नसते. माझ्या घरात कोणी मोठा भाऊ आहे का? आम्ही तिघी बहिणीच आहोत, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. बीडच्या परळी शहरात नटराज रंगमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलतं होत्या.
पंकजा म्हणाल्या की, ‘आज मला बाबांचा चेहरा आपल्यात दिसला. बाबा म्हणायचे की, बेटा तुझ्या कार्यकर्त्यांना आतापासूनच टक्कल पडत आहे. मात्र माझ्या कार्यकर्त्यांना भरपूर केस आहेत. आज जर ते असते तर ते म्हणाले असते की, आपलं वय जगाला कळेल असत म्हणून ते त्यांच्या मित्रांना असा अमृत अमृतमहोत्सव साजरा करण्यास दिला नसता, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आठवणींना उजाळा दिला.
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा अमृत महोत्सव घेता आला नाही. ती संधी अन् हे भाग्य आमच्या नशिबी नव्हते. आज सुद्धा माझे बाबा नाहीत हे दुःख पचवण मला खूप कठीण जाते तर त्यांच्या मित्रांनाही पचवणं कठीण होत पण आपल्या सगळ्याच्या सोबतीमुळे आम्ही एकमेकांना सहारा देत आलो. अचानकपणे बाबा आम्हाला सोडून गेले अन् माझ्या खांद्यावर परिवार सांभाळण्याचे खूप मोठं आव्हान होतं. माझे खांदे ओझ्याने झुकले होते पण सर्वांनी वाटून घेतलेल्या जिमेदारीमुळे मी आज मोकळेपणाने काम करत असल्याचे ही बोलताना पंकजा मुंडे म्हणल्या.
‘एखाद्या माणसाला चांगलं बोलून झालं नाही तरी चालेल पण एखाद्याचे वाईट बोलेन, असं माझ्याकडून होणं नाही. परिवार एकाठिकाणी असणे हे खूप मोठं भाग्य असतं आणि त्यांना एकवटून ठेवण्याचे भाग्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही, माझ्या घरात आहे का कोणी मोठा भाऊ, का कोणी आम्हाला सांगणारे नाही, आम्ही तीन मुली आहोत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी मनातील भावना बोलून दाखवली.