Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारीचे पुण्यात जोरदार स्वागत; आझम स्पोर्ट्स अकादमीकडून जल्लोष; एक लाखाचा धनादेश सुपूर्द

यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, मेहनत केल्यानंतर मिळालेले फळ हेच सुखावणारे असते. यासाठी मेहनतीला कोणताही पर्याय नाही, असे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या सचिन खिलारी याने सांगितले.

  • By युवराज भगत
Updated On: Sep 14, 2024 | 07:55 PM
Para-athlete Sachin Khilari gets a warm welcome in Pune Jubilation from Azam Sports Academy One lakh check handed over

Para-athlete Sachin Khilari gets a warm welcome in Pune Jubilation from Azam Sports Academy One lakh check handed over

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पॅरिस येथे नुकत्याच झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत एफ ४६ प्रकारात गोळाफेकमध्ये १६.३२ मीटरची गोळाफेक करून सचिन खिलारीने भारताला रौप्यपदक मिळवून दिले. त्या कामगिरीनंतर प्रथमच सचिन खिलारी पुण्यात आला होता. सचिन सराव करीत असलेल्या आझम स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने यावेळी त्याची महात्मा गांधी रास्ता, कॅम्प ते आझम कॅम्पस अशी मिरवणूक काढली होती. मिरवणुकीनंतर झालेल्या कार्यक्रमात सचिनने उपस्थित असलेल्या युवा खेळाडूंशी संवाद साधला.

आझम स्पोर्ट्सकडून 1 लाखाचा धनादेश

यावेळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सदस्य एस ए इनामदार, सचिनचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण, आझम स्पोर्टस अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सचिन खिलारीला आझम स्पोर्ट्स अकादमीच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

….. अन् रौप्यपदक मिळविण्यात यशस्वी

यावेळी बोलताना सचिन म्हणाला, वातावरणाशी जुळून घेता यावे यासाठी आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झालो होतो. स्पर्धेच्या एक दिवस आधी आम्ही मैदानावर गेलो होतो, त्यावेळी तेथील प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद नक्कीच आम्हाला प्रेरणा देणारा होता. याच प्रेरणेमुळे रौप्यपदक मिळविण्यात यशस्वी झालो.

डॉ. इनामदार सर यांनी उभा केला शेड

स्पर्धेपूर्वी सराव करण्यासाठी आम्हाला जर्मनीला पाठविण्यात येणार होते, मात्र मी आझम स्पोर्ट्स अकादमीमध्येच सराव करण्याचे निश्चित केले होते. डॉ. इनामदार सर यांनी उभे करून दिलेल्या शेडमध्येच मी सराव केला. याच गोष्टीचा मला मोठा फायदा झाला. पावसामुळे सर्वांचे सराव बंद होते, मात्र मी एकटा शेडमध्ये सराव करत होतो, असे सचिन खिलारीने बोलताना सांगितले.

डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, भारतीय महिला संघात खेळणारी किरण नवगिरे आणि पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारी या दोन्ही खेळाडूंना आवश्यक असलेल्या सोइसुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या. याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. या दोन्ही खेळाडूंनी आझम कॅम्पसचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले असून यांच्याकडून युवा खेळाडूंना नक्कीच प्रेरणा मिळेल, असा मला विश्वास आहे.

Web Title: Para athlete sachin khilari gets a warm welcome in pune jubilation from azam sports academy one lakh check handed over

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 07:53 PM

Topics:  

  • Paralympic Games
  • Pune

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.