Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Sports Day 2024 : Paris Olympic 2024 मध्ये सहभागी महाराष्ट्रातील ऑलिंम्पिक वीरांचा पुणेकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचवणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा पुणेकर नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या वतीने शनिवार, ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या समारंभाचे आयोजन केले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 29, 2024 | 09:58 PM
Maharashtra's Olympic heroes in Paris Olympic 2024 will be felicitated on 31st August by the people of Pune

Maharashtra's Olympic heroes in Paris Olympic 2024 will be felicitated on 31st August by the people of Pune

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचवणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा सन्मान पुणेकरांच्या वतीने करण्यात येणार आहे. भारताचे माजी हॉकी कर्णधार, पदमश्री, अर्जुन आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानीत मा. श्री धनराज पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, एलीव्हेट एज कन्सल्टिंग ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पाटील व उद्योगपती पूनित बालन यांच्या हस्ते या सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे.

या खेळाडूंचा असणार सहभाग

या समारंभाबाबत अधिक माहिती देताना सोमेश्वर फऊंडेशनचे अध्यक्ष सनी विनायक निम्हण यांनी सांगितले की, सत्कारमूर्ती खेळाडूंमध्ये पॅरिस ऑलिंपिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळे, पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेले तिरंदाज प्रविण जाधव आणि अॅथलेटक्समधील खेळाडू सर्वेश कुशारे, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सर्वात कमी वयात सुवर्णपदकाला गवसणी घालणारी भारताची पहिली सुवर्णपदक विजेती सातारची महिला तिरंदाज अर्जुन पुरस्कार सन्मानीत आदिती स्वामी आणि तिरंदाजीमधीलच मूळचा नागपूरचा पण सध्या सातारा येथे प्रविण सावंत यांच्याकडे प्रशिक्षण घेत असलेला सुवर्णपदक विजेता अर्जुन पुरस्कार सन्मानीत ओजस देवतळे, जगज्जेता मल्लखांबपटू पुण्याच्या महाराष्ट्रीय मंडळाचा विश्व अजिक्यपद स्पर्धेत १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदके पटकावणारा शुभंकर खवले यांचा समावेश आहे.

प्रशिक्षकांचा होणार सन्मान

खेळाडूंच्या जडण घडणीमध्ये त्याच्या प्रशिक्षकाचा मोलाचा व महत्वाचा वाटा असतो याची जाणीव ठेवत प्रशिक्षकांनासुद्धा पुणेकरांच्यावतीने गौरविण्यात येणार असल्याचे क्रीडा जागृतीचे अध्यक्ष प्रताप जाधव यांनी सांगितले. स्वप्निल कुसळे याच्या प्रशिक्षीका माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती दिपाली देशपांडे, आदिती स्वामी आणि ओजस देवतळेचे प्रशिक्षक सातारचे प्रविण सावंत, मल्लखांबपट्टू शुभंकर खवळे याचे प्रशिक्षक अभिजीत भोसले यांचा याप्रसंगी सन्मान करण्यात येणार आहे.

क्रीडा पत्रकारांचा करणार सन्मान

मराठी क्रीडा पत्रकारीतेमधील सुमारे ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा पत्रकारीता केलेल्या आणि पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने दखल घेतलेल्या मा. विनायक दळवी, मा. सुहास जोशी आणि मा. शरद कद्रेकर यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार असल्याचे या कार्यक्रमाचे सचिव आणि जेष्ठ क्रीडा समीक्षक संदीप चव्हाण यांनी अधिक माहिती देताना सांगितले. या उदयोन्मुख खेळाडूंचे कौतुक करण्यास या समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार सन्मानीत सौ. स्मिता यादव-शिरोळे, अर्जुन पुरस्कार सन्मानीत श्रीमती शकुंतला खटावकर, मा. श्री. शांताराम जाधव, मा. श्री. श्रीरंग इनामदार आणि मा. श्री. काका पवार लाभले आहेत.

मान्यवरांची उपस्थिती

प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहर भाजपा अध्यक्ष मा. श्री. धीरज घाटे, शहर काँग्रेस अध्यक्ष मा. श्री. अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मा. श्री. दिपक मानकर, राष्ट्रवादी (शरद पवार) शहराध्यक्ष मा. श्री. प्रशांत जगताप, शिवसेना शहर प्रमुख मा. श्री. प्रमोद भानगिरे, शिवसेना (उबाठा) शहर प्रमुख मा. श्री. गजानन थरकुडे, मनसे शहर प्रमुख मा. श्री. साईनाथ बाबर, शिवसेना (उबाठा) पक्षाचे शहर प्रमुख मा. श्री. संजय मोरे, आम आदमी पार्टीचे शहरप्रमुख मा. श्री. सुदर्शन जगदाळे व मा. श्री. धनंजय बेनकर आणि वंचित बहुजन आघाडीचे शहरप्रमुख मा. अॅड. अरविंद तायडे आदी मान्यवर हजर राहणार आहेत.

 

Web Title: Paris olympic 2024 maharashtras olympic heroes who participated in paris olympic including bronze medalist swapnil kusale were felicitated on behalf of people of pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 09:53 PM

Topics:  

  • Muralidhar Mohol
  • Paris Olympic 2024

संबंधित बातम्या

पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…
1

पुणेकरांसाठी खुशखबर! Metro च्या ‘या’ टप्प्याला केंद्र सरकारची मंजूरी; कसा असणार प्रोजेक्ट? पहाच…

Muralidhar Mohol: पुरंदर विमानतळाबाबत मुरलीधर मोहोळांनी केले वक्तव्य; म्हणाले, “पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी…”
2

Muralidhar Mohol: पुरंदर विमानतळाबाबत मुरलीधर मोहोळांनी केले वक्तव्य; म्हणाले, “पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी…”

Pune Airport: “हवाई दलाच्या या जागेत…”; विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाबाबत मंत्री मोहोळांनी घेतली बैठक
3

Pune Airport: “हवाई दलाच्या या जागेत…”; विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाबाबत मंत्री मोहोळांनी घेतली बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.