Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pulse Polio Vaccination: पिंपरी-चिंचवडमध्ये रविवार २८ जून रोजी ‘पल्स पोलिओ मोहीम’; ५ वर्षांखालील बालकांना लस देण्याचे आवाहन

Pulse Polio Vaccination: मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरभर पत्रके, बॅनर्स, स्टिकर्स, वॉल पेंटिंग, व्हीएमडी डिस्प्ले, सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 24, 2026 | 08:58 PM
Pulse Polio Drive, PCMC Halth, Pimpri Chinchwad News, Mayor Ravi Landge,

Pulse Polio Drive, PCMC Halth, Pimpri Chinchwad News, Mayor Ravi Landge,

Follow Us
Follow Us:
  • शहरातील ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन सुरक्षित करणे.
  • शहरातील सर्व पालकांना आपल्या ५ वर्षांखालील बालकांचे शंभर टक्के लसीकरण करून घ्यावे
  • भारतात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने आणि यशस्वीपणे राबवली जात आहे.
 

Pulse Polio Vaccination: जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केल्यानंतर भारतात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन त्यांचे संरक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे.

याच अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

या मोहिमेदरम्यान २८ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील विविध पोलिओ बूथवर बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत आरोग्य कर्मचारी घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे डोस देणार आहेत.

Ashadhi Wari 2026: पुणे महापालिकेची आषाढी वारीसाठी मेगा तयारी! मेट्रो मार्गाखालील अडथळे २ दिवसांत हटवण्याचे आदेश

११२३ लसीकरण केंद्रे, सुमारे ५ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

शहरातील ५ वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण सेवा पोहोचविण्यासाठी महानगरपालिकेने एकूण ११२३ लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. यामध्ये महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये १००८ स्थायी केंद्रे उभारण्यात आली आहेत.

तसेच बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि मेट्रो स्थानकांवर ३५ ट्रान्झिट लसीकरण केंद्रे, तर वीटभट्ट्या, बांधकामस्थळे आणि स्थलांतरित कुटुंबांच्या वस्त्यांमध्ये ७७ फिरती लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. याशिवाय रात्रीच्या वेळेत सेवा देण्यासाठी तीन विशेष नाईट टीमही तैनात करण्यात आल्या आहेत.

ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ९५ वैद्यकीय अधिकारी, ३१९ पर्यवेक्षक आणि ४५५२ लसीकरण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, महिला आरोग्य समिती सदस्य, रोटरी क्लबचे स्वयंसेवक तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

मोहिमेच्या जनजागृतीसाठी शहरभर पत्रके, बॅनर्स, स्टिकर्स, वॉल पेंटिंग, व्हीएमडी डिस्प्ले, सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित

पोलिओमुक्त भारतासाठी नागरिकांच्या सहभागाचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. रविवार, २८ जून रोजी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत.”

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, “५ वर्षांखालील सर्व नवजात बालके तसेच किरकोळ आजारी असलेल्या बालकांनाही पोलिओची लस देता येते. यापूर्वी पोलिओचे लसीकरण झालेले असले तरी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पुन्हा डोस देणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील तसेच परिसरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची नागरिकांनी काळजी घ्यावी.”

 

 

Web Title: Pcmc pulse polio vaccination drive june 28 mayor ravi landge urges parents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pulse Polio Vaccination

संबंधित बातम्या

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल
1

Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
2

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
3

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश
4

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे 48 तासांत बुजवा, कामचुकारपणा केल्यास…; आयुक्तांचे महापालिका अधिकाऱ्यांना कडक निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.