Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PDCC Bank Update: पीडीसीसीकडून अडीच हजार कोटींचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट

गतवर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी वार्षिक पतआराखड्‌यानुसार हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार ३७० कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 07, 2025 | 09:38 AM
31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:

पुणे:  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी) नेहमीच शेतकऱ्यांना होणारे पीक कर्जवाटप सर्वाधिक होत आहे. यंदाच्या २०२५-२६ च्या पीक कर्जवाटपाचा जिल्हानिहाय वार्षिक पतआराखडा लवकरच राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत अंतिम होण्याची अपेक्षा आहे. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा बँकेने ठेवले असून, कर्जवाटपास नियमितपणे सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी व व्यापारी बँका, ग्रामीण बँक आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप केले जाते. गतवर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी वार्षिक पतआराखड्‌यानुसार हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना सुमारे ६ हजार ३७० कोटी रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी पन्नास टक्के वाटा हा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा होता. तर सुमारे साडेतीन  लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज २०२५-२६ च्या वार्षिक पतआराखड्‌यासाठी लवकरच बैठक होऊन तो अंतिम केला जाणार असल्याची माहिती अग्रणी बँकेच्या सूत्रांकडून समजली.

Chhatrapati Sugar Factory Election: ‘छत्रपती’ कारखान्याचा गड विरोधकांनी जिंकला; अजित पवारांनी सोपवली सत्ता

दरम्यान, जिल्हा बँकेस गतवर्षीच्या खरीप २०२४-२५ मध्ये सुमारे २ हजार ४३ कोटी ४३ लाख रुपयांइतके पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर जिल्हा बँकेने प्रत्यक्षात २ लाख ३५ हजार ६५ शेतकऱ्यांना खरीप हंगामात २ हजार ३०९ कोटी ७८ लाख २६ हजार रुपयांइतके (११२.३३ टक्के) पीक कर्जवाटप पूर्ण केलेले होते.

देशात शेतकर्‍यांना सर्वाधिक पीक कर्जवाटप करण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक नेहमीच आघाडीवर राहिलेली आहे. यंदाच्या खरीप हंगामात एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने योग्य त्या सूचना सर्व शाखांना देण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीकडून जिल्हा बँकेस देण्यात येणाऱ्या उद्दिष्टांहून अधिक पीक कर्जवाटप करण्यास आम्हाला नेहमीच यश आलेले आहे. यंदाही देण्यात येणाऱ्या उद्दिष्टापेक्षा अधिक कर्जवाटप निश्चित केले जाईल. पावसाने वेळेवर अनुकूल साथ दिल्यास शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आदी निविष्ठांच्या खरेदी वेळेत करण्यासाठी पीक कर्ज तत्काळ देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. – प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, पुणे

 

Price Drop: लाँचिंगनंतर महिनाभरातच घसरली Samsung च्या या बजेट स्मार्टफोनची किंमत, कंपनीने के

Web Title: Pdcc aims to distribute crop loans worth rs 2500 crore nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 09:38 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.