Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रथम

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत सन २०२१-२२ या वर्षासाठी राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महानगरपलिका गटात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावत बहुमान मिळवला आहे.  

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 18, 2022 | 07:00 PM
राज्यस्तरीय स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रथम
Follow Us
Follow Us:

पिंपरी : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेत सन २०२१-२२ या वर्षासाठी राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांपैकी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता व सर्वोत्कृष्ट कल्पना या वर्गवारीत महानगरपलिका गटात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) प्रथम क्रमांक पटकावत बहुमान मिळवला आहे.

कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार, ई- गव्हर्नन्स तसेच लोकाभिमुख कार्यालय या उपक्रमांत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अव्वल ठरली असून, १० लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असा पुरस्कार राज्य शासनाकडून घोषित झाला आहे.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता आणि निर्णयक्षमता आणण्याकरता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” ही योजना राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात आली. या अभियानांतर्गत सहभाग घेऊन स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना आणि उपक्रम सुचविणाऱ्या शासकीय संस्था, अधिकारी आणि कर्मचारी यांना पारितोषिक देण्यात येणार असून, राज्यस्तरावर प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ४ वर्गवारीत पारितोषिक वितरित केले जाणार आहेत.

या  स्पर्धेसाठी सर्व स्तरांवरून ऑनलाईन प्रस्ताव मागविण्यात आले होते. या अभियानांतर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांची छानणी तसेच परीक्षण राज्यस्तरीय निवड समितीने केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेने या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रशासकीय कामकाजामध्ये नवनवीन संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार केला आहे. शिवाय लोकाभिमुख कार्यालयाचे व्यवस्थापन केले असून, नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिकेने केलेले काम राज्यात अव्वल ठरले असून, त्यासाठी प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाल्याने शहराचा बहुमान वाढला आहे.

नागरिकांचा सहभाग आणि योगदान यामुळेच हे शक्य झाले असल्याची भावना असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी व्यक्त केली. या सहकार्याबद्दल आयुक्त पाटील यांनी नागरिकांचे आभार मानले असून, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचा-यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation came first in the state level competition nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2022 | 07:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.