Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri Chinchwad News:पिंपरी-चिंचवड महापालिकेत बांधकाम अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Pimpri Chinchwad News: सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर यांच्याकडून जलनिस्सारण विभाग काढून त्यांच्याकडे बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहशहर अभियंता विनय ओहोळ यांच्याकडे जलनिस्सारण विभाग कायम ठेवून पर्यावरण अभियांत्रिकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

  • By anuradha sagar
Updated On: Sep 12, 2026 | 11:52 AM
Pimpri Chinchwad News, PCMC Corruption Inquiry

Pimpri Chinchwad News, PCMC Corruption Inquiry

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
  • भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट तक्रार
  • मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना दिले प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश
Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागातील अधिकाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी बांधकाम विभागाचे सहशहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या कामकाजाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली होती. संबंधित अधिकारी अनेक वर्षांपासून बांधकाम परवानगी विभागात कार्यरत असून अधिकारांचा गैरवापर करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप हिंगे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

Mumbai News: गणपती उत्सवासाठी मुंबई पोलिस दल झाले सज्ज! २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी बंदोबस्तासाठी राह

तसेच, बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी दाखल केल्या जाणाऱ्या नस्तींमध्ये जाणीवपूर्वक तांत्रिक अडचणी, उणिवा आणि त्रुटी काढून मंजुरी प्रक्रियेला विलंब केला जातो, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

विकास प्रकल्पांमधील जागांचा मूळ नकाशा किंवा रस्ता बदलणे, मंजूर आरक्षणाचे कारण सांगणे, कागदपत्रांमध्ये कायदेशीर अडथळे निर्माण करून नागरिकांची मानसिक व आर्थिक पिळवणूक केली जात आहे, असेही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शहर अभियंता, मुख्य अभियंत्यांच्या कामकाजाचे फेरवाटप

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता आणि मुख्य अभियंत्यांच्या कामकाजाचे फेरवाटप करण्यात आले आहे. शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे पाणीपुरवठा, बांधकाम परवानगीसह पाच विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे महत्त्वाच्या स्थापत्य विभागासह विविध पाणी प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

शहर अभियंता म्हणून सेठिया यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. पर्यावरण विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांना निलंबित करण्यात आल्यानंतर ओंभासे यांच्याकडे पर्यावरण विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कामकाजाचे फेरवाटप केले आहे.

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!

कोणाकडे कोणते विभाग?

शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे पुढील विभाग सोपवण्यात आले आहेत :

– पाणीपुरवठा
– बांधकाम परवानगी
– शहरी दळणवळण
– जलनिस्सारण
– झोपडपट्टी पुनर्वसन

याशिवाय तळवडे येथील जैवविविधता उद्यान, संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, वाकड येथील बॅडमिंटन कोर्ट, पिंपरी चौकातील माता रमाई सृष्टी आणि प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदान या विशेष प्रकल्पांची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे महत्त्वाचे स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, उद्यान व क्रीडा आणि पर्यावरण अभियांत्रिकी विभाग सोपवण्यात आले आहेत. तसेच भामा-आसखेड, आंद्रा पाणी योजना, पवना बंदिस्त जलवाहिनी आणि निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र या महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर यांच्याकडून जलनिस्सारण विभाग काढून त्यांच्याकडे बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहशहर अभियंता विनय ओहोळ यांच्याकडे जलनिस्सारण विभाग कायम ठेवून पर्यावरण अभियांत्रिकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कार्यकारी अभियंता संध्या वाघ यांना पदोन्नती देऊन सहशहर अभियंता करण्यात आले असून, त्यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांचीही बदली

महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी पूजा दूधनाळे यांची भूमी आणि जिंदगी विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय विभागाच्या प्रशासन अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे. दरम्यान, संतोष कोराड यांच्याकडे ‘ह’ क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.

 

Web Title: Pimpri chinchwad pcmc building permission department corruption inquiry devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Pimpri Chinchwad crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.