Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gang Attack: पिंपरी-चिंचवड हादरले! साने चौक परिसरात धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल!

Gang Attack: धावत्या दुचाकीचा पाठलाग करत कोयत्याने जीवघेणा वार! पिंपरी-चिंचवडमधील या थरारक घटनेने हादरले शहर... सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा भयानक प्रकार...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 17, 2026 | 02:36 PM
Gang Attack: पिंपरी-चिंचवड हादरले! साने चौक परिसरात धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल!

Gang Attack: पिंपरी-चिंचवड हादरले! साने चौक परिसरात धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल!

Follow Us
Follow Us:
  • गावगुंडाने दुचाकीस्वारावर कोयत्याने केला जीवघेणा हल्ला
  • प्रसंगावधान राखल्याने वार चुकला, पण हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
  • तक्रार नसतानाही, पोलिसांनी व्हिडिओची दखल घेऊन आरोपीचा शोध सुरू केला
Gang Attack: पुणे जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या साने चौक परिसरात एका गावगुंडाने धावत्या दुचाकीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीने पाठलाग करून चालवलेला हा वार थोडक्यात चुकला, परंतु हा सगळा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा: Black Magic Scam:”दहा वर्षे घरात सुरू होती अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा खेळ!”ज्येष्ठ दाम्पत्याचे ६ कोटींहून अधिक संपत्तीची लुट!

घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साने चौक परिसरात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ सुरू होती. लोक रस्त्यावर ये-जा करत होते आणि काही जण आपली दुकानं बंद करत होते. अशातच एका मवाली आणि उद्धट गावगुंडाने दुचाकीस्वाराला लक्ष्य करत त्याच्यावर अचानक कोयत्याने वार केले. सुदैवाने, या भीषण हल्ल्यात दुचाकीस्वाराने कमालीचे प्रसंगावधान राखल्यामुळे त्याचे प्राण वाचले आणि तो थोडक्यात बचावला.

मात्र, या थरारक घटनेचा व्हिडिओ परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण हातात धारदार हत्यार (कोयता) घेऊन अत्यंत त्वेषाने दुचाकीचा पाठलाग करताना दिसत आहे. हा तरुण दुचाकीस्वरावर हल्लाही करतो, पण काही इंचाने वार चुकतो. जर हा वार दुचाकीस्वराला लागला असता, तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता.

हेही वाचा: Mumbai local Train: विनातिकीट प्रवाशाच्या रागाचा फटका भलत्याच निरपराध नागरिकाला; मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

अद्याप तक्रार नाही, तरीही चिखली पोलिसांकडून शोध सुरू

या जीवघेण्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित दुचाकीस्वाराने चिखली पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात उघडपणे हातात कोयते बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या अशा मुठभर गुंडांचा चिखली पोलिसांनी कसून शोध सुरू केला असून, लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही थरारक घटना कुठे घडली आहे?

    Ans: पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साने चौक परिसरात ही घटना घडली.

  • Que: हल्लेखोराने दुचाकीस्वारावर कशाने वार केला?

    Ans: हल्लेखोर तरुणाने हातात धारदार कोयता घेऊन धावत्या दुचाकीस्वारावर वार करण्याचा प्रयत्न केला.

  • Que: पोलीस या प्रकरणी काय कारवाई करत आहेत?

    Ans: अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसली, तरी व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे चिखली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Pimpri chinchwad chikhali sane chowk koita gang attack viral video sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad crime
  • Pimpri Crime
  • pune crime case
  • Pune Viral Video

संबंधित बातम्या

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…
1

Newborn Baby: “रात्रीच्या अंधारात ओढ्यातून आला रडण्याचा आवाज…” त्या अमानुष प्रकाराने…

Koyta Gang Attack: रात्रीच्या अंधारात हादरले हडपसर! सुरक्षक्षकावर जीवघेणा हल्ला करून पळणाऱ्या गुंडांनी तब्बल ११ गाड्या फोडल्या…
2

Koyta Gang Attack: रात्रीच्या अंधारात हादरले हडपसर! सुरक्षक्षकावर जीवघेणा हल्ला करून पळणाऱ्या गुंडांनी तब्बल ११ गाड्या फोडल्या…

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई
3

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

Theft News: पहाटे महिला काकड आरतीला गेली अन् …सीसीटीव्हीतील दृश्याने पोलिसांची चक्रं फिरवली!
4

Theft News: पहाटे महिला काकड आरतीला गेली अन् …सीसीटीव्हीतील दृश्याने पोलिसांची चक्रं फिरवली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.