फोटो सौजन्य: @narendramodi (X.com)
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी एक प्रेरणा आहे. त्यांचे चरित्र हे नेहमीच भरकटलेल्या आयुष्याला योग्य दिशा देत असते. मात्र, शिवरायांचा इतिहास जिवंत आहे तो त्यांच्या किल्ल्यांमुळे. आजही महाराष्ट्रातील अनेक किल्ले महाराजांच्या पराक्रमाचे साक्षिदार आहेत, जे नेहमीच शिवभक्ताना खुणवत असतात. मात्र, अनेकदा त्याच्या गड-किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले जाते. अशातच, एक आनंदाची बातमी आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता शिवरायांचा पराक्रम सातासमुद्रापार पोहोचणार आहे. यानंतर विविध क्षेत्रातील व्यक्तींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
१२ किल्ल्यांचा ‘युनेस्को’ मध्ये समावेश, राज ठाकरेंनी दिला इशारा – ‘ही गोष्ट हलक्यात घेतल्यास…’
शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी X (Twitter) आपले विचार मांडले आहे. ते म्हणतात, प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे. या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर १ तामिळनाडू मध्ये आहे. जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो. कोणत्याही अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीने हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात. मी सर्वांना आवाहन करतो की, या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या.”
प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे.
या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर १ तामिळनाडू मध्ये आहे.
जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान… https://t.co/J7LEiOAZqy
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2025
Ratnagiri News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग होतोय मृत्यूचा सापळा ; भोस्ते घाटात भीषण अपघात
2014 साली नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. आता शिवरायांच्या किल्ल्यांचा जागितक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर, मोदींनी पुन्हा एकदा आपल्या रायगड भेटीला उजाळा दिला आहे. ते म्हणतात,”ही 2014 मध्ये मी रायगड किल्ल्याला दिलेल्या माझ्या भेटीची छायाचित्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याची संधी मला लाभली होती. ही भेट मी सदैव स्मरणात राहील.”