Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे करणार उद्घाटन

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होत आहे. यानंतर स. प. महाविद्यालय मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. या सभेवर आता पावसाचे सावट आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2024 | 12:20 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर; सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे उद्घाटन

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.26) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या निमित्ताने होणाऱ्या सभेवर पावसाचे सावट आले आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा घेतली जाणार आहे. ही सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शहर भाजपकडून प्रयत्न सुरु असून, महापालिका प्रशासनालाही सतर्क राहावे लागणार आहे.

हेदेखील वाचा- ‘अधिकाऱ्यांना धमकवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात’; संजय राऊतांचा घणाघात

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होत आहे. यानंतर स. प. महाविद्यालय मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. या सभेवर आता पावसाचे सावट आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच बुधवारी पुणे आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, या सभेच्या ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे मैदानात चिखल निर्माण झाला आहे. तसेच स्वारगेट, सारसबाग, स. प. महाविद्यालयाच्या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असले तरी, पावसामुळे ते काम दर्जेदार होईल का ? याविषयी शंका निर्माण झाली आहे.

निवडणूक प्रचाराची सुरुवात

या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. महायुती आघाडीच्या ताकदीचे प्रदर्शन म्हणून याकडे पाहिले जात आहे. या जाहीरसभेकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.

अवकाश उड्डाणांवर बंदी

पंतप्रधानांच्या दौऱ्यातील सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दोन दिवस पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून सफारी, ड्रोनचा वापर आणि मायक्रोलाइट यांसारख्या अवकाश उड्डाणांवर बंदी घातली आहे. कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Pm narendra modi to visit pune tomorrow inauguration of civil court to swargate metro line nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2024 | 12:20 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब
1

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!
2

Maharashtra Clean Energy Mission : महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाचे नेतृत्व करणार—अणुऊर्जेत ऐतिहासिक पाऊल!

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य
3

PM Modi On Bihar Election Result: “कट्टा सरकार पुन्हा कधीही…”; पंतप्रधान मोदींचे बिहारच्या विजयावर भाष्य

भाजपा सरकारकडून तरुणांची फसवणूक, कुठे गेले वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन? काँग्रेसचा सवाल
4

भाजपा सरकारकडून तरुणांची फसवणूक, कुठे गेले वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन? काँग्रेसचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.