Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Road Mitra App: खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेचे PMC Road Mitra अॅप बंद

रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ मोबाईल ॲपवर अपलोड केल्यास, केवळ ७२ तासांत ते खड्डे बुजवले जातील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 12, 2026 | 02:14 PM
Pothole reporting app, Road repair dashboard, PMC road department,

Pothole reporting app, Road repair dashboard, PMC road department,

Follow Us
Close
Follow Us:
  • खड्डेमुक्तीसाठी १२ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या थाटात सुरू करण्यात आलेले ‘PMC Road Mitra’ अ‍ॅप अवघ्या सहा महिन्यांतच बंद पडले आहे.
  • हे अ‍ॅप बंद पडल्याची साधी माहिती देखील महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान (IT) आणि पथ विभागाला नसल्याचे समोर आले आहे.
  • खड्ड्यांचे फोटो अपलोड केल्यावर ७२ तासांत रस्ते दुरुस्त करण्याचा प्रशासनाचा दावा अ‍ॅप बंद झाल्यामुळे पूर्णपणे निष्क्रिय ठरला आहे.
PMC Road Mitra App: शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर सातत्याने टिका केली जात होती. त्यातच राज्य शासनानेदेखील खडसावल्यानंतर महापालिका प्रशासनाला खडबडून जाग आली. महापालिकेने शहरातील रस्त्यांची थेट तक्रार महापालिकेला मिळावी, यासाठी PMC Road Mitra या मोबाईल अॅपची सुरूवात केली,पण अवघ्या सहा महिन्यातच हे अॅप बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra Politics : “नमो नमो अन् जय श्रीराम म्हणा, गॅस आपल्या दारात; LPG गॅस तुटवड्यावरुन विरोधकांची बोचरी टीका

महत्त्वाची बाब म्हणजे, महापालिकेच्या महिती आणि तंत्रज्ञान विभगाला आणि पथ विभागालाही हे अॅप बंद पडल्याची कोणतीही माहिती नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची किती दुरावस्था झाली आहे हे समोर आले आहे. १२ ऑगस्ट २०२५ रोजी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या अॅपचे अनावरण करण्यात आले होते.

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ मोबाईल ॲपवर अपलोड केल्यास, केवळ ७२ तासांत ते खड्डे बुजवले जातील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. या नव्या व्यवस्थेमुळे खड्डेमुक्तीच्या कामात पारदर्शकता आणि वेग येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती.

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांची रांग; राष्ट्रवादीत अंतर्गत चुरस

नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढून अ‍ॅपवर अपलोड केल्यास, ती तक्रार कोणतीही मध्यस्थी न होता थेट महापालिकेच्या पथ विभागाकडे (Road Department) पोहोचेल. तक्रार प्राप्त झाल्यापासून केवळ ७२ तासांच्या आत संबंधित खड्डा बुजवला जाईल, असा ठाम दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. खड्डा बुजविण्याची वैयक्तिक जबाबदारी संबंधित भागाच्या उपअभियंत्यावर (Deputy Engineer) देण्यात आली होती. पण हे अॅपच बंद पडल्यामुळे नागरिकांसाठी सुरू केलेला हा उपक्रम निष्क्रिय ठरल्याचे दिसत आहे.

दरम्यान, यासंदर्भात बोलतना पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, “अॅप बंद पडल्याचे समजल्यानंतर संबंधित विभागांना ते अॅप सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. नागरिकांसाठी हे अॅप लवकरच सुरू केले जाईल.”

 

Web Title: Pmc road mitra app municipal corporations pmc road mitra app for pothole free roads is closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:14 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.