mumbai Police notice to Kunal Kamra audience
मुंबई : कॉमेडियन कुणाल कामरा हा चर्चेमध्ये आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर विडंबनात्मक कविता सादर केल्यामुळे त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कुणाल कामरा याला पोलिसांनी दोन समन्स बजावले आहेत. मुंबईतील खार पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कुणाल कामरा याने मद्रास न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्याला अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
कुणाल कामरा याला पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर देखील तो हजर झालेला नाही. खार पोलीस त्याचा शोध घेत असून कुणाल कामरा याला पोलिसांचे संरक्षण देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे. कुणाल कामरा हा सोशल मीडिया द्वारे पोस्ट करुन त्याची मते मांडत आहेत. दरम्यान, कुणाल कामरा याच्या शोमध्ये उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील ‘युनिकॉन्टिनेंटल’ हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ या स्टुडिओमध्ये ‘नया भारत’ हा स्टॅण्ड अप कॉमेडी शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
2 फेब्रुवारी रोजी कॉमेडियन कुणाल कामरा याच्या शोसाठी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमावेळी उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना देखील पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. काही प्रेक्षकांचे जबाब देखील नोंदवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता कुणाल कामराच्या शोला उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांची देखील चौकशी केली जाणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १७९ अंतर्गत प्रेक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कलमांतर्गत पोलिसांना प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय. पी. सिंह एका वृत्तवाहिनीला याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पोलिसांना या शोमधील एक-दोन प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. मात्र, या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याची आवश्यकता नाही, असे मत त्यांनी मांडले आहे.
Going to an address where I haven’t lived for the last 10 Years is a waste of your time & public resources… pic.twitter.com/GtZ6wbcwZn
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 31, 2025
पोलिसांनी दोन वेळा समन्स बजावून देखील कॉमेडियन कुणाल कामरा चौकशीसाठी हजर झालेला नाही. त्यामुळे खार पोलीस एक्शनमोडमध्ये आले आहेत. मुंबईतील माहिम येथील कुणाल कामरा याच्या वडिलांच्या घरी दाखल पोलीस गेले होते. मात्र तो त्याच्या मुंबईतील घरी नसल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी कुणाल कामरा याच्या आई वडिलांकडे त्याच्याबाबत चौकशी केली. कुणालशी संपर्क झाला आहे का? तो मुंबईत येणार आहे का? चौकशीसाठी हजर होणार आहे का? असे प्रश्न पोलिसांनी कुणालच्या आई-वडिलांना विचारले. गेल्या १० वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे… अशी सोशल मीडिया पोस्ट कुणाल कामरा याने केली.