Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस पाटलाच्या मुलीने दुचाकीला धडक दिली अन्…; शिरुर तालुक्यात घडला ‘पोर्शे अपघात पॅटर्न’

शिरुर तालुक्यात पोर्शे अपघात पॅटर्नचीचं पुनरावृत्ती झाली असुन एका पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2024 | 02:37 PM
पोलिस पाटलाच्या मुलीने दुचाकीला धडक दिली अन्…; शिरुर तालुक्यात घडला ‘पोर्शे अपघात पॅटर्न’
Follow Us
Follow Us:

शिक्रापुर : पुणे जिल्ह्यातील हिट अँड रण प्रकरणात एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दारुच्या नशेत आलिशान पोर्शे कार चालवून दोघांना उडवल्याची घटना देशभरात गाजत असताना नुकतेच शिरुर तालुक्यात या पोर्शे पॅटर्नचीचं पुनरावृत्ती झाली असुन एका पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने मालवाहू पिकअप चालविताना दुचाकीला धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू होऊन एक तरुण गंभीर जखमी झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटलासह त्याच्या अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरणगाव (ता. शिरुर) येथील वडगाव बांडे रस्त्याने अरुण मेमाणे व मच्छिंद्र बांडे हे दोघे त्यांच्या जवळील एमएच १२ व्ही आर २०७२ या दुचाकीहून चाललेले असताना अचानक आरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे यांची एमएच १२ एस एफ ३४३९ हि पिकअप पोलीस पाटील यांची अल्पवयीन मुलगी चालवत असताना अचानकपणे पिकअपची मेमाणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.

दरम्यान पिकअपने दुचाकीसह दोघांना काही अंतर फरपटत नेले यावेळी पोलीस पाटील संतोष लेंडे देखील त्यांच्या अल्पवयीन युवती शेजारी बसलेले होते मात्र अपघात होताच शेजारील नागरिकांनी दुचाकीवरील दोघांना शिरुर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले, मात्र उपचारापूर्वीच अरुण विठ्ठल मेमाणे (वय ३०) रा. वडगाव बांडे (ता. दौंड) जि. पुणे याचा मृत्यू झाला तर महिंद्र रावसाहेब बांडे (वय २६) रा. वडगाव बांडे (ता. दौंड) जि. पुणे हा जखमी झाला.

अपघातानंतर पोलीस हवलदार किशोर तेलंग व लहानू बांगर यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी देखील केली. तर याबाबत सतिश विठ्ठल मेमाणे (वय २६) रा. वडगाव बांडे (ता. दौंड) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी आरणगावचे पोलीस पाटील संतोष लेंडे निवृत्ती व त्यांची अल्पवयीन युवती दोघे रा. आरणगाव (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करत आहे.

पोलीस पाटलांनी केला पोलीस स्टेशनला फोन

आरणगाव येथे पिकअप व दुचाकीचा अपघात घडल्यानंतर पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी स्वतः शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच तळेगाव ढमढेरे पोलीस चौकीमध्ये फोन करुन अपघाताची माहिती दिली असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Police patils daughter hit a bike incidents in shirur taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2024 | 02:37 PM

Topics:  

  • maharashtra
  • police patil

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार
1

Pratap Sarnaik: रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी मोठे पाऊल! सासवडमध्ये देशातील पहिले अत्याधुनिक रस्ते सुरक्षा केंद्र उभारणार

मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन
2

मोशीच्या कचरा प्रश्नावर महापालिकेसह राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार; आमदार महेश लांडगे यांचे आश्वासन

Parbhani News: परभणी मनपा कर्मचाऱ्यांचे पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन! विविध विभाग कडकडीत बंद
3

Parbhani News: परभणी मनपा कर्मचाऱ्यांचे पुन्हा बेमुदत कामबंद आंदोलन! विविध विभाग कडकडीत बंद

BH नंबर प्लेटचा फायदा काय? कोणाला मिळते आणि अर्ज कसा करायचा? दुसऱ्या राज्यात गेल्यावर गाडीची पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही!
4

BH नंबर प्लेटचा फायदा काय? कोणाला मिळते आणि अर्ज कसा करायचा? दुसऱ्या राज्यात गेल्यावर गाडीची पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.