मंगळवेढा : मरवडे येथील स्मशानभूमी भिंतीच्या आडोशाला गोलाकार बसून 52 पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळताना पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 73 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून समाधान पाटील, शिवाजी मासाळ, गुलाब इनामदार, भारत पाटील, सुरेश टोमके, सुभाष शिवशरण,शहाजान मुजावर,उस्मान मणेरी, विजय सोनवणे, लक्ष्मण पवार आदी दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मरवडे येथे दिनांक 21 रोजी 4.00 वाजता स्मशानभूमी भिंतीच्या आडोशाला काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिस अधिकार्यांना मिळताच सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, वरील दहा आरोपी गोलाकार बसून 52 पानाच्या पत्त्यावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असताना दिसून आले.
पोलिसांनी रोख रक्कम, 5 मोबाईल, 6 मोटर सायकली असा एकूण 2 लाख 73 हजार 450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याची फिर्याद पोलिस शिपाई मळसिध्द कोळी यांनी दिल्यावर दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.