Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसईतील तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलीस यशस्वी

२०० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासल्यावर तीन मुली दोन तरुणांसोबत वसई रेल्वे स्टेशन येथून लोकलने दादर, बोरिवली, नालासोपारा येथे प्रवास करुन नालासोपारा स्थानकात उतरल्याचे दिसून आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 05, 2024 | 05:35 PM
वसईतील तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलीस यशस्वी
Follow Us
Close
Follow Us:

वसई । रविंद्र माने : वसईच्या चुळणे गावातून बेपत्ता झालेल्या तिन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले असून, तुंगारेश्वरच्या घनदाट जंगलातील अंधारात ७ किमी पायपीट करुन त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांना फूस लावून पळवून नेणार्‍या तरुणाला ही अटक करण्यात आली आहे.

वसईच्या चुळणे गावात राहणार्‍या १५ आणि १३ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी त्यांच्या १५ वर्षीय मोलकरीणसह बेपत्ता झाल्या होत्या. या मुलींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी ४ पथके तयार केली होती. या मुलींच्या वडीलांच्या तबेल्यात काम करणारे दोन तरुणही याचवेळी बेपत्ता झाले होते. त्यामुळे त्यांनीच या तिघींना फुस लावून पळवून नेल्याचा अंदाज बांधत पोलीसांच्या पथकाने त्यांच्या घरापासून सिसीटिव्ही फुटेजची तपासणी केली.

तब्बल २०० ठिकाणचे सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासल्यावर तीन मुली दोन तरुणांसोबत वसई रेल्वे स्टेशन येथून लोकलने दादर, बोरिवली, नालासोपारा येथे प्रवास करुन नालासोपारा स्थानकात उतरल्याचे दिसून आले. तिथून रिक्षा पकडून ते वसई फाटा येथे उतरले आणि रानशेतपाडा, पेल्हार येथे जातांना दिसून आले. त्यामुळे पोलीसांच्या पथकाने रानशेतपाडा परिसरातील सी.सी.टी.व्ही कॅमेरे तपासून स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळवली. त्यावेळी सदर मुली तुंगारेश्वर येथील डोंगरावर आढळून आल्याचे पोलीसांना समजले.

त्यानंतर पोलीसांच्या पथकाने रात्री ८ वाजल्यापासून तुंगारेश्वर डोंगर पिंजून काढण्यास सुरुवात केली. ४ किलोमीटर पायी डोंगर चढून तीन तास घनदाट जंगल तपासल्यावर सदर ३ मुली दोन तरुणांसह सापडल्या. त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा रात्रीच्या अंधारात ४ तासांची पायपीट करुन पोलीसांना त्यांना सुखरुप डोंगरावरुन खाली आणले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी उपनिरिक्षक सनिल पाटील, रोहिणी डोके, हवालदार शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी, गोविंद लवटे, आनंदा गडदे, प्रविण कांदे, पुजा कांबळे यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Police succeeded in tracing three minor girls from vasai palghar crime case vasai maharashtra crime case thane virar nalasopara crime cases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2024 | 05:35 PM

Topics:  

  • palghar crime case
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी
3

Mumbai Rain Update : मुंबई, ठाण्यातील परिस्थितीचा उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा, मिठी नदीची केली पाहणी

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
4

Dahi Handi 2025 : 10 थरांचा विश्वविक्रम, कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.