Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण-इस्त्रायल युद्धामुळे गॅस टंचाईची शक्यता; आता बायोगॅसकडे वळण्याची गरज

ऊर्जा संकटाचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होऊ शकतो. सिमेंट, स्टील, सिरेमिक, काच, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच अनेक लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूवर अवलंबून आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 14, 2026 | 02:58 PM
युद्धामुळे गॅस टंचाईची शक्यता; बायोगॅसकडे वळण्याची गरज

युद्धामुळे गॅस टंचाईची शक्यता; बायोगॅसकडे वळण्याची गरज

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : मध्यपूर्वेतील तणाव आणि २०२६ मध्ये उभ्या राहिलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांसाठी ही परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे.

भारताच्या ऊर्जा गरजांपैकी सुमारे ८५ टक्के कच्चे तेल आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संघर्ष, वाहतूक मार्गांवरील अडथळे किंवा पुरवठ्यातील व्यत्यय यांचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर होऊ शकतो. ऊर्जा दरवाढ झाल्यास एलपीजी सिलेंडर महाग होणे, वाहतूक खर्च वाढणे आणि शेती उत्पादनाचा खर्च वाढणे अशी साखळी प्रतिक्रिया निर्माण होते. विशेषतः ग्रामीण भागात डिझेल, खत आणि वीज खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण येण्याची शक्यता असते.

ऊर्जा संकटाचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही होऊ शकतो. सिमेंट, स्टील, सिरेमिक, काच, अन्न प्रक्रिया उद्योग तसेच अनेक लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूवर अवलंबून आहेत. गॅस टंचाई किंवा दरवाढ झाल्यास उत्पादन खर्च वाढून उद्योगांची स्पर्धात्मकता कमी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर देशाने स्थानिक ऊर्जा स्रोतांकडे वळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. देशात उपलब्ध असलेला पशुधन कचरा, शेती अवशेष आणि अन्नकचरा यांचा वापर करून बायोगॅस व कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) तयार करता येऊ शकतो. एपीएमसी बाजारपेठांमध्ये निर्माण होणारा सेंद्रिय कचरा तसेच साखर उद्योगातील प्रेसमड यांचाही बायोगॅस निर्मितीसाठी उपयोग होऊ शकतो.

बायोगॅस प्रकल्पांमुळे कचरा व्यवस्थापन, स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि सेंद्रिय खत निर्मिती अशा अनेक समस्या एकाच वेळी सोडवता येऊ शकतात. त्यामुळे ऊर्जा स्वावलंबनासोबतच ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळू शकते, अशी माहिती ‘एनर्जी बायो सिस्टिम्स प्रा. लि.’चे संस्थापक व गॅस निर्मिती क्षेत्रातील अभ्यासक गजानन पाटील यांनी दिली.

घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणी वाढ

इराण-अमेरिका युद्धामुळे गॅस सिलेंडर पुरवठा प्रभावित होणार असल्याच्या अफवांमुळे शहरात बाजारात खळबळ उडाली आहे. परिणामी, घरगुती गॅस सिलिंडरची मागणी अचानक वाढल्याने काही ठिकाणी तुटवड्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा फायदा घेत काही ठिकाणी काळाबाजार सुरू झाल्याचे समोर आले आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडरची अधिकृत किंमत सुमारे ९०० रुपये असताना काळ्या बाजारात तोच सिलिंडर तब्बल २२०० रुपयांपर्यंत विकला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.

हेदेखील वाचा : Strait of Hormuz Tension : आखातात 23000 भारतीय खलाशी, होमुर्जच्या सामुद्रधुनीत 24 जहाजे, केंद्राने परिस्थितीचा दिला आढावा

Web Title: Possibility of gas shortage due to war need to turn towards biogas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • lpg cylinder

संबंधित बातम्या

World Bank Warning: भय इथले संपत नाही… 4.5 कोटी लोकं धोक्यात, Iran युद्धाबाबत जागतिक बँकेचा मोठा इशारा
1

World Bank Warning: भय इथले संपत नाही… 4.5 कोटी लोकं धोक्यात, Iran युद्धाबाबत जागतिक बँकेचा मोठा इशारा

Gas Connection रद्द होणार? सरकारचा खळबळजनक निर्णय; ‘या’ यादीत तुमचे नाव तर नाही ना?
2

Gas Connection रद्द होणार? सरकारचा खळबळजनक निर्णय; ‘या’ यादीत तुमचे नाव तर नाही ना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.