सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कशामुळे झाला? प्रकाश आंबेडकरांनी पोस्टमॉर्टम रिपोर्टच केला पोस्ट
परभणीमध्ये अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अवमान केल्यानंतर हिंसाचार उसळला होता. यात अनेक भागांतून जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यात खळबळ उडाली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत होता. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायिक समितीच्या देखरेखीखाली त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला असून प्रकार धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.
आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मारहाणीत झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची आज हाक देण्यात आली होती. या बंदला बीड, परभणी, नांदेड, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान वचिंत बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्ट मार्टम रिपोर्ट सर्वांसमोर आणला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झालेल्या जखमा आणि अटॅकमुळे झाला असल्याचा अहवाल छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमधून मिळाला आहे. हा अहवाल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सोलापुरातही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्व पोलिसांना निलंबित करा. पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी रिपाइंचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदेंनी केलीय.
काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये अज्ञात व्यक्तीने संविधानाचा अवमान केल्याने हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात अनेक भागांतून जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 40 जणांना अटक केली आहे. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्यायायलीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र न्यायालयीन कोठतीत त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात राज्यात खळबळ उडाली होती. यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असा आरोप होता. मात्र आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा, असा पोलिसांचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात न्यायिक समितीच्या देखरेखीखाली त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आता समोर आला..