Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ॲप-आधारित वाहनाद्वारे प्रवाशांची होणारी लूट थांबणार, प्रताप सरनाईक यांनी दिला कारवाईचा इशारा

परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMRTA) यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या काही दिवसांत २६३ अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल ₹३.८८ लाख इतका दंड ठोठावण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2025 | 04:45 PM
आता ॲप-आधारित वाहनाद्वारे प्रवाशांची होणारी लूट थांबणार, प्रताप सरनाईक यांनी दिला कारवाईचा इशारा

आता ॲप-आधारित वाहनाद्वारे प्रवाशांची होणारी लूट थांबणार, प्रताप सरनाईक यांनी दिला कारवाईचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार ॲप-आधारित वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण (MMRTA) यांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, गेल्या काही दिवसांत २६३ अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तब्बल ₹३.८८ लाख इतका दंड ठोठावण्यात आला आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, सरकारच्या निर्णयानुसार ॲप-बेस वाहने चालविण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणे तसेच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी ८० टक्के भाडे देणे बंधनकारक असून, प्रवाशांकडून ठरविलेल्या दरापेक्षा कमी जास्त भाडे आकारता येणार नाही.

‘आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळांची टीका

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबईत अनेक ॲप-आधारित वाहने प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारींनंतर परिवहन विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष म्हणजे, शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच प्रवाशांकडून भाडे आकारले पाहिजे. परंतु काही चालक विना परवाना तसेच अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचे आढळून आले. अशा चालकांवर कारवाईसाठी मैदान पोलिस ठाणे, सांताक्रूझ पोलिस ठाणे आणि अंधेरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत.

ऑटो-टॅक्सींसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेले दर

ऑटो रिक्षासाठी (मीटरप्रमाणे) पहिल्या टप्प्यासाठी (१.५ किमी) ₹ २६ भाडे

काळी-पिवळी टॅक्सी (मीटरप्रमाणे) पहिल्या १.५ किमी साठी ₹३१ भाडे

यानंतर मीटरनुसार प्रवासाचे दर रुपये २०.६६ पैसे प्रति आकारले जातील. Ac वाहनांना १० % अधिक भाडे निश्चित केले आहे..

‘महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम २०२५’ अंतर्गत नवे आदेश

या नियमानुसार राज्यात ई-बाईक आणि इलेक्ट्रिक दुचाकींद्वारे प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी आहे. दुचाकींसाठी पहिल्या १.५ किमी प्रवासाचे भाडे ₹१५ तर नंतर प्रति किमी ₹ १०.२७ आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ॲग्रिगेटर्स पॉलिसी लागू

राज्यात ॲप-बेस वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने ‘ॲग्रिगेटर्स पॉलिसी’ लागू केली आहे. यानुसार परवान्याशिवाय ॲप-आधारित सेवा देणाऱ्या कंपन्यांवर व त्यांच्या चालकांवर कारवाई होणार आहे. मुंबईत बेकायदेशीर वाहनचालकांनी तातडीने नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन विभागाचे सचिव तथा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळस्कर यांनी दिला आहे.

तसेच एकंदरीत, प्रवाशांची फसवणूक रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी शासनाने आखलेल्या धोरणांनुसार ॲप-आधारित रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहनांवर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात पावले उचलण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

Web Title: Pratap sarnaik on warning of action against illegal app based taxis rickshaws and vehicles by

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Mumbai
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?
1

मुंबईतील तापमान १७ अंशांपर्यंत घसरले, ठाणे आणि नवी मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढला, येत्या काही दिवसांत हवामान कसं राहणार?

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार
2

अर्पणद्वारे मुंबईत ‘बाल सुरक्षा सप्ताह’ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!
3

एसटीला इलेक्ट्रिक बसेस वेळेवर न पुरवणाऱ्या कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान, श्रीरंग बरगे यांचा आरोप!

Mumbai CNG Shortage: वाहतुकीचा बोजवारा! मुंबईत सीएनजी पुरवठा विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा
4

Mumbai CNG Shortage: वाहतुकीचा बोजवारा! मुंबईत सीएनजी पुरवठा विस्कळीत, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.