'आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही'; छगन भुजबळांची टीका (फोटो -सोशल मीडिया)
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी सहा मान्य केल्या आणि संबंधित निर्णय (जीआर) जारी केला. अजित पवार यांनी राजकारण करताना जात-पात नात्याचा विचार नाही, माणूस पाहतो आणि मदत करतो, असे म्हटले आहे. त्यावरूनच आता राजकीय चर्चा सुरु आहेत.
समाजाच्या मागणीप्रमाणे आर्थिक आरक्षण मिळणे योग्य आहे, त्याला दुमत नसावे. भुजबळ यांनी विरोध केला आणि सांगितले की, आरक्षण ही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ओबीसी मागासलेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या देण्याला आम्ही विरोध करतो. त्यांच्या वक्तव्यामुळे आरक्षणावर राजकीय वाद पेटला आहे.
छगन भुजबळ यांनी माध्यमांशी विविध मुद्यांवर भाष्य केले. टोमॅटो आणि भाजीपाला यांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी रडत आहेत. काही ठिकाणी जमीन खरडली गेली, द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. अन्नधान्य ज्या ठिकाणी खराब झाले, त्यांना उभारायला तीन-चार वर्षे लागतील. प्राथमिक मदतीला सुरुवात झाली असून, अन्नधान्य ज्या ठिकाणी खराब झाले, त्या ठिकाणी परिस्थितीनुसार, दहा किलो दिले जाते. छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, राज्य सरकार त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे उभे आहे आणि सरकारकडून शक्य तेवढी मदत केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांनी लगेच घेतली दखल
धनंजय मुंडे यांच्या मागणीची दखल मंत्री छगन भुजबळ यांनी लगेच घेतली. भुजबळ म्हणाले, धनंजय मुंडे तुम्हाला काय काम द्यायचे ते पक्ष आणि अजितदादा ठरवायचे तेव्हा ठरवतील. पण त्याआधी तुम्ही एक काम करा. आपल्याला गोपीनाथ मुंडे यांनी जो वारसा दिला आहे, तो संभाळा. महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण धोक्यात आणले गेले आहे. ते ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी काम करा. लोकांमध्ये जाऊन जनजागृती करा, असा सल्ला छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडे यांना दिला.