Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको; उर्वरित मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध,’ मंत्री प्रताप सरनाईक यांचे एसटी कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असून सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५६ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यापुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल, तेव्हा ती वाढ एसटी कर्मचाऱ्यांनाही आपोआप लागू होईल.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 12, 2026 | 04:42 PM
Pratap Sarnaik statement on ST workers,

Pratap Sarnaik statement on ST workers,

Follow Us
Follow Us:

“एसटी ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून लाखो गोरगरीब, विद्यार्थी, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून बहुतेक मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र आंदोलनाच्या मार्गाने प्रवाशांना वेठीस धरू नका,” असे भावनिक आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

शिव-परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित अभिनंदन व सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले असून सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ५६ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे. यापुढे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढेल, तेव्हा ती वाढ एसटी कर्मचाऱ्यांनाही आपोआप लागू होईल. त्यामुळे महागाई भत्त्यासाठी भविष्यात आंदोलन करण्याची गरज भासणार नाही.

याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ करण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित आर्थिक मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सर्व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

एसटी प्रवाशांनो लक्ष द्या ! सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड काढून घ्याच; ‘या’ तारखेपासून कार्ड असेल बंधनकारक

यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक साद घालत सांगितले की, “१५ जूनपासून शाळा सुरू होत आहेत. ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी एसटीवर अवलंबून आहेत. अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आयुष्याचा आधार एसटी आहे. अशा वेळी आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांचे प्रवास आणि सर्वसामान्यांच्या जगण्याची घडी विस्कटू नये. कर्मचाऱ्यांच्या भावना आम्हाला समजतात, पण जनतेची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेणे आपले सामूहिक कर्तव्य आहे.”

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनशील असून उर्वरित मागण्यांवरही सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देत, “संवादाचा मार्ग खुला आहे; संघर्षाऐवजी समन्वयातूनच सर्वांचे हित साधले जाईल,” असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

मुंबई आधी कोळी बांधवांचीच; गिरगाव चौपाटीवरील बोटी हटवण्याच्या कारवाईला मंत्री मंगल प्रभात लोढांचा ब्रेक, प्रशासनाला कडक निर्देश

Web Title: Pratap sarnaik statement on st workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • Maharashtra State Road Transport Corporation
  • Pratap Sarnaiik

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.