
Preparations for elections have begun but the Election Commission has not announced the program Jalgaon News
Local Body Elections : तळोदा: नगरपालिका निवडणुक आखाड्यात उतरण्यासाठी अनेक पहेलवान जोरबैठका काढायला लागले असून, निवडणूक आयोगाच्या आदेशाआधीच राजकीय पक्षांकडून उमेदवारीस योग्य पहेलवानांची चाचपणी सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे.
काँग्रेससह विविध पक्षांच्या बैठका सध्या सुरू असून वरिष्ठ नेते हे नगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा असे सांगत आहेत. आधी जिल्हा परिषद निवडणूक होणार नाही, असे आम्हाला सांगितले गेले आहे, असे पक्षांचे कार्यकर्ते सांगत आहेत. आयोगाने मात्र अजूनही नगरपालिका आधी की जिल्हा परिषद आधी, याचा निर्णय केलेला नाही, प्राप्त माहितीनुसार आयोगाने विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यादृष्टीने मते मागविणे सुरू केले आहे. अलीकडची अतिवृष्टी आणि महापूर यामुळे सर्वत्र ग्रामीण भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तेथे जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूक लगेच घेण्यासारखी स्थिती नाही. म्हणूनच आयोगाने आधी नगरपालिका निवडणूक घेण्याचा पर्याय ठेवला आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधी मतदार याद्या, आरक्षण निश्चिती करा, आदी प्रकारची जी पूर्वतयारी करावी लागते ती नगरपालिका आणि जिल्हा परिषदांची एकाच वेळी करण्यावर आयोगाने भर दिला आहे. नगरपालिकेचे आरक्षण आधी जाहीर झाले असल्याने पालिका निवडणुक आधी होतील असा कयास केला जात आहे.
नगरपालिका निवडणुका आधी झाल्या तर त्याचे निकाल मतदानानंतर दोन दिवसांनी मतमोजणी करून लावायचे की जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांनंतर एकत्रितपणे निकाल जाहीर करायचे असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण, आधी झालेल्या निवडणुकीचा निकाल लगेच जाहीर केला तर त्याचा परिणाम नंतरच्या निवडणुकांवर होऊ शकतो, असा आक्षेप घेतला जाण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याबाबत उत्सुकता आहे. दि २७ रोजी निवडणूक आयोग व राजकीय पक्षांचा मुंबईत झालेल्या बैठकीवरून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक रणधुमाळीचा वाजणार बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पालिका आखाड्यात शड्डू ठोकणे झाले सुरू
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होईल, शेवटी जानेवारीअखेर महापालिकांची निवडणूक होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पूरग्रस्त पॅकेजची मदतीस आणखी १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. या मदतीला आचारसंहितेचा फटका बसायचा नसेल तर आधी नगरपालिका निवडणूक घेणे हे सत्तारुढ महायुतीच्या दृष्टीने सोयीचे असेल. मदत आपत्तीग्रस्तांना पूर्णतः पोहोचण्याआधी ग्रामीण भागाशी संबंध असलेल्या जि.प., पं. स.ची निवडणूक घेतली तर त्यातून आलेल्या नाराजीचा फटका महायुतीतील घटक पक्षांना निवडणुकीत शक्यता लक्षात घेता, पालिका निवडणुकाच आधी होतील. म्हणुनच पालिका आखाड्यात शड्डू ठोकणे सुरू झाले आहे.