Preparations for the stay of the Warkaris at Kadamwakvasti for the palanquin of Sant Tukaram Maharaj
कदमवाकवस्ती : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही कदमवाकवस्ती पालखी स्थळ येथे मुक्कामी येणार असून लाखो भाविकांचे लक्ष पालखी येणार याकडे लागले आहे. कदम वाकवस्ती या ठिकाणी ग्रामपंचायत कदम वस्ती यांचे व प्रशासनाचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे मोठ्या प्रमाणावर प्रशासन सज्ज झालेली आहे.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी कायदा सुव्यवस्थेचे गांभीर्य लक्षात घेता चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे. कदमवाकवस्ती येथे पालखी मुक्कामी असल्याने निर्मल वारी मुक्काम प्रमुख अक्षय दोमाले हे सलग दहा दिवस या ठिकाणी व्यवस्थापनेसाठी तळ ठोकून आहेत. या ठिकाणी कामाची पाहणी करून प्रशासनाच्या मदतीने वरिष्ठांना तेथील घडामोडींची माहिती देत आहेत. परंतु या ठिकाणी महसूल विभागाचा एकही कर्मचारी दिसत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महसूल विभाग या ठिकाणी नसल्याने प्रशासनाचा भाग आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याप्रमाणे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीमध्ये पालखी स्थळावर व्यवस्थापनेचे काम एकदम उत्कृष्टरित्या चालू असून यामध्ये हायजेनिक पद्धतीने पावसाचा विचार करून कॉटेज बनवले गेले आहेत. तसेच चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने बसवलेले आहेत. आरोग्य विभागाचे स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. पालखी स्थळावर पोलीस यंत्रणेचे सुरक्षा भिंत बनवण्यात आली आहे. महिला व पुरुष नागरिकांना दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी बॅरिकेट उभे करून गोंधळ होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी १२०० शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महामार्ग मुख्य समन्वयक संतोष दाभाडे, महामार्ग प्रमुख देहू ते पंढरपूर विशाल वेदपाठक यांची पालखी व्यवस्थेसाठी व वारकऱ्यांच्या सोईसाठी या ठिकाणी बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. पालखी स्थळावरती ग्रामपंचायत कर्मचारी पंचायत समितीचे कर्मचारी जिल्हा परिषदचे कर्मचारी स्थानिक लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी रामदास मेमाणे हे उपस्थित राहून सर्व प्रकारची पाहणी करत आहेत.
कदमवाकवस्ती या ठिकाणी महसूल प्रशासन सोडून इतर प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद ग्रामपंचायत कदमवाकवस्ती पोलीस प्रशासन उत्तमरित्या काम करत आहेत. महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित दिसून येत नाहीत. तलाठी मंडलाधिकारी एकदाही उपस्थित दिसत नाहीत याची मला खूप शोकांतिका वाटते की या पालखी व्यवस्थापनेमध्ये तहसील कार्यालयाचे काय जबाबदारी आहे की नाही यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का ? हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया मुक्काम प्रमुखांनी दिली आहे.