Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील शेतीचे रक्षण; माकड निर्बीजीकरण केंद्राच्या प्रस्तावावर विचार

कोकणातील माकड आणि वानरांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीवर उपाय म्हणून राज्य सरकार रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माकड निर्बीजीकरण केंद्र उभारण्याचा विचार करत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 23, 2025 | 09:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

कोकणातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासावर उपाय शोधण्यासाठी राज्य सरकारकडून पावले उचलली जात आहेत. विशेषतः वानर आणि माकडांच्या उपद्रवामुळे फळबागा आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, याला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्याचे केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर अवघ्या ८ तासात? समृद्धी महामार्गाचे काम १०० टक्के पूर्ण, एक्सप्रेस वे ‘या’ दिवशी सुरू होणार

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांशी झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री नाईक होते. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उपसचिव विवेक होसिंग, कोल्हापूरचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, तसेच दापोली ग्रामोद्योग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक विनायक महाजन, पत्रकार मिलिंद लिमये आणि वन्यजीव अभ्यासक संतोष महाजन उपस्थित होते. प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास आणि अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

बैठकीदरम्यान विनायक महाजन यांनी दापोलीत रानडुकर, माकडे आणि वानरांमुळे होत असलेल्या शेतीच्या नुकसानीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, आता माकडे गावात घुसून घरातील वस्तूंचेही नुकसान करत आहेत. या समस्येचे समाधान म्हणून वनमंत्री नाईक यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांच्या निर्बीजीकरणासाठी केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू असल्याचे सांगितले. वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Big Breaking: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने श्रीनगरला रवाना; अडकलेल्या पर्यटकांना परत आणणार

रानडुकरांमुळे फळबागा आणि भातशेतीचेही नुकसान होत असून, शेतकऱ्यांना याविरोधात कायदेशीर चौकटीत राहून कार्यवाही करण्यासाठी अनुमती द्यावी, असे निर्देशही वनमंत्री नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. पूर्वी वितरित केलेले शस्त्र परवाने निलंबित झाल्याने, नव्याने नियमानुसार शेतकऱ्यांना परवाने द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. शेवटी, महाजन यांनी वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी, तसेच साळिंद्र प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचाही विचार भरपाईत व्हावा, अशी मागणी केली.

Web Title: Protection of agriculture in konkan consideration on proposal for monkey deworming center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 09:40 PM

Topics:  

  • Konkan

संबंधित बातम्या

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी
1

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच
2

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Konkan Ganeshotsav: ‘जगात भारी कोकणचा गणेशोत्सव’! आरत्या, भजनांचे सूर आणि…; शेकडो वर्षांची परंपरा
3

Konkan Ganeshotsav: ‘जगात भारी कोकणचा गणेशोत्सव’! आरत्या, भजनांचे सूर आणि…; शेकडो वर्षांची परंपरा

Ganesh Chaturthi 2025: “…म्हणून म्हणतात गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला”; ‘अशी’ आहे गणपतीपुळ्याच्या मंदिराची आख्यायिका
4

Ganesh Chaturthi 2025: “…म्हणून म्हणतात गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला”; ‘अशी’ आहे गणपतीपुळ्याच्या मंदिराची आख्यायिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.