Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट; सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

या प्रकरणाचा तपास पूर्णपणे सीबीआयकडे देण्याचा विरोधही घनश्याम उपाध्याय यांनी केला आहे. दरम्यान, न्यायालयानेही सीबीआयला काही प्रकरणात पिंजऱ्यातील बंदिस्त पोपटाची उपमा दिली होती, त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकरी असावेत, असेही त्यांनी सुचवले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 28, 2024 | 01:24 PM
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट; सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
Follow Us
Follow Us:

मुंबई:  मुंबई पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू नंतर पोलिसांपासूर राज्यातील सत्ताधारी पक्षावरही गंभीर आरोप होऊ लागले आहेत.त्यानंतर या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानेही या घटनेसंदर्भात महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत एन्काऊंटरसंदर्भात शंका उपस्थित केली होती. या प्रकरणी येत्या 3 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

अशातच मुंबईतील एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात या  प्रकरणी जनहित याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन कऱण्याची मागणीही केली आहे.

हेही वाचा : पाटणमध्ये राजकीय तणावपूर्ण परिस्थिती; ठाकरे गट अन् शिंदे गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले

कोण आहे जनहित याचिका करणारा वकील

मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय  यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच, न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात यावे आणि    एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही  जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.

याशिवाय अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील एफ आयआर दाखल कऱण्यात यावी, एसआयटीकडून या एन्काऊंटरचा तपास व्हावा, या एसआयटीमध्ये सीबीयच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा, पोलीस कर्तव्यार असताना बॉडी कॅमच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांवरही नियंत्रण ठेवण्याचे आदेश केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना देण्यात यावे, अशी मागणी घनश्याम उपाध्याय यांनी याचिकेत केली आहे.

हेही वाचा : ‘या’ दिवशी व्हावी मतदान प्रक्रिया; भाजपची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी

त्याचबरोबर, या प्रकरणाचा तपास पूर्णपणे सीबीआयकडे देण्याचा विरोधही घनश्याम उपाध्याय यांनी केला आहे. दरम्यान, न्यायालयानेही सीबीआयला काही प्रकरणात पिंजऱ्यातील बंदिस्त पोपटाची उपमा दिली होती, त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे अधिकरी असावेत, असेही त्यांनी सुचवले आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च  न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांनी या एसआयटीचे नेतृत्त्व करावे,असेही या याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Public interest litigation filed in supreme court in akshay shinde encounter case nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2024 | 01:24 PM

Topics:  

  • Akshay Shinde Encounter
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार
1

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका; सुप्रीम कोर्ट पुढील आठवड्यात सुनावणी करणार

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
2

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?
3

UPI Payment करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! Supreme Court चा निकाल; ग्राहक की व्यापारी कोणावर पडणार 0.4% चार्जचा भार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.