ujjwal nikam
मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. दरम्यान या राजकीय घडामोडीवर वरिष्ठ विधिज्ञ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
वसंतरावच्या घरी नांदायचं. गळ्यात मंगळसूत्र पंडितरावांच्या नावाचं घालायच आणी उखाणा विलासराव नावाने घ्यायचा आणी गर्भ देवरावांचा अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली आहे.सत्तेचा सारीपाट कोणाकडे आहे आपल्याकडे कसा येईल हाच प्रयत्न सध्या प्रत्येक राजकीय पार्टी करीत आहे. तर पक्षांतर कायदा हा लोकशाही सुदृढ करण्यासाठी आहे. पण यातही पळवाटा आहे. यासाठी पक्षांतर कायद्याचे स्वरूप जाचक केले पाहिजे जेणेकरून एका पक्षात दुसऱ्या पक्षात जाण्याचा कोणी धाडस करणार नाही.असा सल्ला आज वरिष्ठ विधिज्ञ वकील उज्वल निकम यांनी दिला आहे.
राज्यात सध्य मोठ्या घडामोडी सुरु आहेत. त्यावर उज्ज्वल निकम म्हणाले की, उपसभापती हे विधानसभेचे कामकाज पाहतात यादरम्यान त्यांना सभापतीचे अधिकार असतात जर उपसभापतीवर अविश्वास दाखविला आणि तो जर फेटाळला गेला तर दाद मागण्यासाठी न्यायालयात जावे लागेल आणि त्यावर काय निकाल देते हे त्या निकालावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे. कारण पावसाळा तोंडावर आहे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे या साठी सरकारला ताबडतोब काहीतरी करून या सरकारला स्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे असल्याचं सूचक वक्तव्य उज्वल निकम यांनी केले आहे.
[read_also content=”शिवसेना आमदार संतोष बांगर यांच बंडखोर आमदारांबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sena-mla-santosh-bangars-controversial-statement-about-rebel-mlas-said-nrdm-297412.html”]
सत्तेचा सारीपाट कोणाकडे आहे आपल्याकडे कसा येईल हाच प्रयत्न प्रत्येक राजकीय पार्टी करत असते. त्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात तर दुसऱ्या पक्षातून तिसरा पक्षात जाण्याचा क्रम हा सुरूच राहणार आहे. त्यावर लगाम लावण्यासाठी पक्षांतर कायदा अजून कडक करणे आवश्यक असल्याचही यावेळी उज्वल निकम म्हणाले.