Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोखाड्यात रस्त्यांची स्थिती सुधारणार? सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली खबरदारीची भूमिका

खोडाळा परिसरातील धोकादायक रस्त्यांची बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरक्षेच्या उपाययोजना सुरू केल्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 29, 2025 | 07:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा ते वाघ्याचीवाडी दरम्यान पालघर वाडा देवगाव राज्य मार्ग क्र. ३४ वर काही दिवसांपूर्वी मोठे भगदाड पडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या भागात रस्ता आतून अर्ध्यापेक्षा अधिक पोकळ झालेला असून, नवख्या वाहन चालकांना धोका निर्माण झाला होता. त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची रांग लागलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेळोवेळी दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांना अपघाताच्या धोक्यातूनच प्रवास करावा लागत होता.

Rohini Khadse : नवऱ्यासाठी बायको उतरली मैदानात; रोहिणी खडसे वकिली कोट घालून कोर्टात दाखल

मात्र, स्थानिक माध्यमांतून या विषयाला वाचा फुटल्यानंतर अखेर बांधकाम विभागाने जाग येत त्या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना केली आहे. रस्त्यावर चेतावणी फलक, अडथळे आणि काही ठिकाणी तात्पुरती डागडुजी करत वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही उपाययोजना उशिरा का होईना, पण रस्त्यावरील धोक्यांची दखल घेतली गेल्याचे समाधानकारक चित्र आहे.

मोखाडा तालुक्यातून जाणारे दोन प्रमुख राज्यमार्ग, राज्यमार्ग क्र. ३४ (पालघर-वाडा-देवगाव) आणि राज्यमार्ग क्र. ३७ (मोखाडा-विहीगाव-कसारा) हे अवजड वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तथापि, या दोन्ही मार्गांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. खोडाळा बाजारपेठ व त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांची संख्या वाढलेली आहे. बाजारपेठ ही मोखाडा तालुक्यातील एक महत्त्वाची आर्थिक केंद्रबिंदू असून प्रवासी, व्यापारी आणि वाहतूकदार मोठ्या प्रमाणावर येथे ये-जा करत असतात.

खोडाळा परिसरातून जाणाऱ्या मोखाडा-विहीगाव मार्गावर जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या जलवाहिनीच्या कामामुळे रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम झाले आहे. यामुळे वाहनचालकांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत असून रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष करत असताना स्थानिक नागरीकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

Thane News : अनधिकृत बांधकामांवर पालिकेची कडक कारवाई ; बोअरवेल आणि पाणीपुरवठा जलवाहिन्या केल्या खंडित

येणाऱ्या गणेशोत्सवात भक्तांना गणपती बाप्पांना खड्ड्यांतूनच आपल्या घरी घेऊन जावे लागणार आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. तरी प्रशासनाने या सगळ्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आणि कायमस्वरूपी दुरुस्तीचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Public works department takes precautionary measures in mokhada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 07:58 PM

Topics:  

  • Palghar news

संबंधित बातम्या

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर
1

Palghar Kotwal Bharti 2026 : सरकारी नोकरीची मोठी संधी! महसूल विभागात 122 जागांसाठी कोतवाल भरती; अर्ज कसा करायचा? पाहा सविस्तर

Leopard Attack : मध्यरात्री दबा धरून बसला अन् थेट…! सफाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ;  ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
2

Leopard Attack : मध्यरात्री दबा धरून बसला अन् थेट…! सफाळ्यात बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ; ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.