Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिक्कीम कार आणि नेपाळमधील विमान दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी आणि पुनामिया कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू; जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली माहिती

त्रिपाठी (Tripathi) आणि पुनामिया कुटुंबीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे मृतदेह कधीपर्यंत भारतात आणले जातील याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान, नेपाळ सरकारकडून या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: May 30, 2022 | 10:59 AM
सिक्कीम कार आणि नेपाळमधील विमान दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी आणि पुनामिया कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू; जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली माहिती
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नेपाळच्या विमान आणि सिक्कीमच्या कार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी आणि पुनामिया कुटुंबातील सर्व सदस्य ठार झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या सदस्यांचा मृत्यू झाल्याचं ट्विट केलं आहे. त्यामुळे ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेपाळमध्ये (Nepal) काल झालेल्या विमान दुर्घटनेत एकूण २२ लोक प्रवास करत होते. त्यात चार भारतीयही होते. या विमानाचा अचानक संपर्क तुटला आणि विमान गायब झाले. बऱ्याच तासानंतर या विमानाचा काही भाग सापडला. मात्र, विमान सापडले नाही. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवासी ठार झाल्याचं सांगितलं जात आहे.

त्रिपाठी (Tripathi) आणि पुनामिया कुटुंबीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे मृतदेह कधीपर्यंत भारतात आणले जातील याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. दरम्यान, नेपाळ सरकारकडून या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे.

[read_also content=”आईचे प्रेम आणि कर्तव्य दोन्ही एकत्र : मुलाला पाठीवर बांधून रस्ता साफ करते आहे महिला सफाई कामगार, फोटो व्हायरल https://www.navarashtra.com/viral/mothers-love-and-duty-both-together-female-sweeper-cleaning-the-road-with-the-child-tied-on-the-back-photos-goes-viral-nrvb-286171.html”]

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून ही दु:खद माहिती दिली आहे. नेपाळमधील विमान तसेच सिक्कीम मोटार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी व पूनमिया या दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील सर्व सदस्य त्यात लहान बालकांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. पर्यटकांसाठी असलेल्या सुरक्षिततेची पूर्तता अत्यावश्यकच आहे, असं आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.

नेपाळ मधील विमान तसेच सिक्कीम मोटार दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी व पूनमिया या दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील सर्व सदस्य त्यात लहान बालकांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे…
पर्यटकांसाठी असलेल्या सुरक्षिततेची पूर्तता अत्यावश्यकच आहे#भावपूर्णश्रद्धांजली
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 30, 2022

एकूण २२ प्रवासी करत होते प्रवास

या विमानातून चार भारतीय आणि ३ जपानी नागरिक प्रवास करत होते. इतर सर्व नेपाळी नागरिक या विमानातून प्रवास करत होते. चालकासह २२ प्रवाशी या विमानातून प्रवास करत होते. हे दोन इंजिनचं विमान होतं. मस्तंग जिल्ह्यात हे विमान शेवटचं पाहिलं गेलं. त्यानंतर हे विमान धौलागिरी पर्वताच्या दिशेने जाताना दिसलं. त्यानंतर हे विमान अचानक गायब झालं.

हेलिकॉप्टर आणि विमान शोधासाठी रवाना

विमानात तीन पायलट होते. कॅप्टन प्रभाकर घिमिरे, फ्लाईट अटेंडेंट किस्मत थापा आणि उत्सव पोखरेल आदींचा यात समावेश होता. या गायब झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी दोन विमानं तैनात करण्यात आली आहेत. तसेच विमानाचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरही तैनात केलं जाणार आहे. जोमसोम येथील घासामध्ये मोठ्ठा आवाज ऐकू आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे विमानाचा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही पृष्टी करण्यात आली नाही. या परिसरात एक हेलिकॉप्टर पाठवून शोध घेतला जात आहे. लेटे येथे या विमानाचा शेवटचा संपर्क झाला होता असं सांगितलं जात आहे.

Web Title: Punamiya and tripathi family members dead in nepal plane crash sikkim car incident nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2022 | 10:59 AM

Topics:  

  • Family Members
  • nepal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.