Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

U19 Women’s T20 World Cup : महिला संघाच्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान वेगवेगळ्या गटांत!

U19 Women's T20 World Cup : आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2027च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेश आणि नेपाळ येथे 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा रंगणार असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी चाहत्यांना वाट पहावी लागणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 21, 2026 | 02:36 PM
U19 Women's T20 World Cup : महिला संघाच्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान वेगवेगळ्या गटांत!

U19 Women's T20 World Cup : महिला संघाच्या विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान वेगवेगळ्या गटांत!

Follow Us
Follow Us:
  • 21 जानेवारीपासून रंगणार थरार
  • भारत स्पर्धेतील गतविजेता
  • पहिला सामना वेस्ट इंडिजशी
 

आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2027 (U19 Women’s T20 World Cup ) च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेश आणि नेपाळ येथे 21 जानेवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार असून, भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटात स्थान देण्यात आले आहे. गतविजेत्या भारतीय संघासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान असेल.

या स्पर्धेतील सामने बांगलादेशमधील चितगाव आणि सिलहट, तसेच नेपाळची राजधानी काठमांडू येथे खेळवले जाणार आहेत. एकूण 41 सामन्यांचा थरार क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. सहभागी 16 संघांची प्रत्येकी 4 संघांच्या 4 गटांत विभागणी करण्यात आली आहे. गटातील सामने 26 जानेवारीपर्यंत खेळवले जातील. त्यानंतर पात्र संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील. या फेरीतील दोन गटांमधून प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

भारताचा वेस्ट इंडिजशी पहिला सामना

भारताचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला असून, या गटात आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि यजमान नेपाळ यांचाही समावेश आहे. भारतीय संघ 22 जानेवारीला काठमांडू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्याच दिवशी नेपाळचा संघ आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरेल.

‘ब’ गटात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि सामोआ यांचा समावेश आहे. ‘क’ गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) हे संघ आहेत. ‘ड’ गटात इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका आणि स्कॉटलंड यांना स्थान देण्यात आले आहे.

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड

पहिल्या दिवशी चार सामने

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी, 21 जानेवारीला चार सामने खेळवले जाणार आहेत. सिलहट येथे यजमान बांगलादेशचा सामना यूएईशी होईल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नायजेरिया यांच्यात लढत रंगेल. काठमांडू येथे श्रीलंका-स्कॉटलंड आणि इंग्लंड-अमेरिका यांच्यात सामने होतील.

चितगावमधील बीर श्रेष्ठ शहीद फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान क्रिकेट स्टेडियम, सिलहट इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, काठमांडूतील त्रिभुवन इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि अपर मुलपानी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंड या चार मैदानांवर स्पर्धेतील सामने खेळवले जाणार आहेत.

IND Vs ZIM: स्मृती मंधानाची ‘कॅप्टन’ म्हणून शानदार सुरुवात; धोबीपछाड देत झिम्बाबेला केले 3-0 ने पराभूत

6 फेब्रुवारीला अंतिम सामना

स्पर्धेतील उपांत्य सामने 4 फेब्रुवारीला चितगाव येथील बीर श्रेष्ठ शहीद फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. 5 फेब्रुवारी हा राखीव दिवस असेल. अंतिम सामना 6 फेब्रुवारीला स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. अंतिम सामन्यासाठी 7 फेब्रुवारी हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी या स्पर्धेमुळे युवा महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल, असे सांगितले. ही स्पर्धा क्रिकेटच्या भविष्याची झलक दाखवणारे व्यासपीठ असून, सहभागी युवा खेळाडू जगभरातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बांगलादेश आणि नेपाळ या सहयजमान देशांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता आणि युवा लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन या देशांची निवड केल्याचेही त्यांनी नमूद केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक २०२७ कधी होणार आहे?

    Ans: ही स्पर्धा २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहे.

  • Que: भारताचा पहिला सामना कोणाविरुद्ध आहे?

    Ans: भारताचा पहिला सामना २२ जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे.

  • Que: भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत का?

    Ans: भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत का?

Web Title: U19 womens t20 world cup india pakistan groups rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Bangaldesh
  • Cricket World Cup
  • India women Team
  • nepal

संबंधित बातम्या

Nepal Bans Indian Biscuits : नेपाळमध्ये भारतीय बिस्किटांवर बंदी! प्रशासनाकडून कठोर निर्णय; थेट दुकानांमधून स्टॉक काढण्याचे निर्देश
1

Nepal Bans Indian Biscuits : नेपाळमध्ये भारतीय बिस्किटांवर बंदी! प्रशासनाकडून कठोर निर्णय; थेट दुकानांमधून स्टॉक काढण्याचे निर्देश

बांगलादेश, नेपाळसारखं भारतात सत्ताबदल अशक्य; Ramdas Athawale यांचं मोठं विधान!
2

बांगलादेश, नेपाळसारखं भारतात सत्ताबदल अशक्य; Ramdas Athawale यांचं मोठं विधान!

Ind vs Zim : महिला फॅन्ससाठी Good News; तीनही टी-20 सामन्यात मिळणार मोफत प्रवेश
3

Ind vs Zim : महिला फॅन्ससाठी Good News; तीनही टी-20 सामन्यात मिळणार मोफत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.